इतरांना समजला का तुमचा Google Pay UPI पिन? काही सेकंदांत करा नवीन पिन सेट
By सिद्धेश जाधव | Published: January 10, 2022 07:17 PM2022-01-10T19:17:04+5:302022-01-10T19:19:13+5:30
How To Change Google Pay UPI PIN: जर तुमचा Google Pay UPI Pin तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही समजला असेल किंवा तशी शंका जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तो बदलू शकता. यासाठी सोप्पी पद्धत पुढे सांगितली आहे.
How To Change Google Pay UPI PIN: Google Pay, Paytm आणि PhonePe अशा ऍप्सचा पैशांचे वापर व्यवहार करण्यासाठी केला जात आहे. वापरायला सोप्पे असल्यामुळे Google Pay चा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. डेबिट आणि क्रेडिट कार्डनं पेमेंट करण्यासाठी जशी ओटीपीची अतिरिक्त सुरक्षा असते तशी गुगल पेमध्ये नाही. इथे सर्व भार Google Pay वरील UPI Pin वर असतो.
हा पिन देखील जास्तीत जास्त 8 अंकी असू शकतो, जो आपण जितक्या सहज लक्षात ठेवतो तितक्या सहज इतरही ठेवू शकतात. जर तुमचा गुगल पे UPI Pin इतरांना कोणाला समजला असेल तर तो तुम्ही बदलू शकता. किंवा तुम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काही ठराविक दिवसांनी आपला पिन बदलू शकता, त्यामुळे तुमची सुरक्षा वाढते. चला जाणून घेऊया गुगल पे युपीआय पिन बदल्याण्याची प्रोसेस.
Google Pay वरून UPI Pin बदलण्यासाठी
- सर्वप्रथम Google Pay ओपन करा
- त्यांनतर उजवीकडे सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
- तिथे बँक अकॉउंटच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- इथे तुमच्या लिंक्ड बँक अकॉउंटची नावं येतील.
- ज्या बँक अकॉउंटचं UPI Pin बदलायचं आहे, त्यावर क्लिक करा.
- त्यांनतर उजवीकडे सर्वात वर असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करा.
- समोर आलेल्या समोर अनेक ऑप्शनमधून Change UPI Pin वर क्लिक करा.
- आता जुना UPI Pin टाका. त्यानंतर नवीन पिन अॅड करा. अशाप्रकारे तुमचा UPI Pin बदलेल.
हे देखील वाचा:
28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर