How To Change Instagram Username: इन्स्टाग्राम युजरनेम कसे बदलायचे जाणून घ्या
By सिद्धेश जाधव | Published: July 29, 2021 06:32 PM2021-07-29T18:32:18+5:302021-07-29T18:33:04+5:30
How to change Instagram username: इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजरनेम खूप महत्वाचे असते. युजरनेमच्या मदतीने लोक तुम्हाला पोस्टमध्ये टॅग करू शकतात.
Instagram किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजरनेम महत्वाची भूमिका बजावतं. बऱ्याचदा अकॉउंट बनवताना निवडलेलं युजरनेम बदलायला लोक विसरतात किंवा त्यांना माहित नसते. कधी कधी लोक आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी युजरनेम म्हणून ठेवतात. अश्यावेळी तुम्ही Instagram अॅप किंवा वेब इंटरफेसच्या माध्यमातून तुमचं युजरनेम अगदी सहज बदलू शकता.
Instagram Username बदलण्यासाठी...
इन्स्टाग्रामवर तुमचं युजरनेम बदलण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- Instagram अॅप ओपन करा
- उजवीकडे खालच्या बाजूला असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा
- आता तुम्ही तुमच्या प्रोफाईल पेजवर पोहोचाल
- तिथे असलेल्या Edit बटणवर क्लिक करा
- आता युजरनेम असलेल्या भगवर टॅप करून जुने युजरनेम डिलीट करून नवीन Username टाका
- त्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Ok बटणवर क्लिक करा
महत्वाची बाब अशी कि तुमचे युजरनेम आधी कोणी वापरलेले नसावे. यासाठी अक्षर, अंक, पूर्णविराम आणि अंडरस्कोरचा वापर करू शकता. युजरनेममध्ये जास्तीत जास्त 30 कॅरेक्टर्सचा वापर करता येईल. इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह शब्दांचा वापर युजरनेम म्हणून ठेवता येत नाही.