TRAI च्या 'या' अॅपने असा चेक करा इंटरनेटचा स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:25 PM2019-02-05T16:25:34+5:302019-02-05T16:37:59+5:30
टेलीकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने स्पीड टेस्ट करण्यासाठी एक नवे अॅप लाँच केले आहे. My Speed असं या अॅपचं नाव असून युजर्स आपला डेटा स्पीड याच्या माध्यमातून चेक करू शकतील.
नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून तो प्रत्येकाच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोनवर इंटरनेटचा स्पीड चेक करण्यासाठी युजर्स नेहमीच वेगवेगळ्या स्पीड टेस्ट अॅप्सचा उपयोग करतात. स्पीड चेक करण्यासाठी स्पीडटेस्ट, फास्ट.कॉम ही अॅप अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र आता टेलीकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने स्पीड टेस्ट करण्यासाठी एक नवे अॅप लाँच केले आहे. My Speed असं या अॅपचं नाव असून युजर्स आपला डेटा स्पीड याच्या माध्यमातून चेक करू शकतील.
My Speed अॅप असे करा डाउनलोड
- ट्रायच्या My Speed अॅपद्वारे डेटा स्पीड चेक करण्यासाठी सर्वप्रथम अॅप स्टोरमधून हे अॅप डाउनलोड करावे लागेल.
- iOS युजर्सने अॅपल अॅप स्टोरमध्ये जाऊन My Speed अॅप सर्च करा. त्यानंतर 'गेट' बटणावर क्लिक करून हे अॅप इनस्टॉल करा.
- अॅन्ड्रईड युजर्स गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन My Speed अॅप सर्च करा आणि इन्स्टॉल पर्याय निवडून अॅप डाउनलोड करा.
My Speed अॅपचा असा करा वापर
- My Speed अॅप डाउनलोड केल्यानंतर ते आपल्या स्मार्टफोनमध्ये ओपन करा.
- अॅपला आवश्यक असलेल्या परमिशन म्हणजेच लोकेशन, मॅनेज फोन कॉल्सला परवानगी द्या.
- इंटरनेट स्पीड चेक करण्यासाठी खालच्या बाजूस डावीकडे असलेले बटण क्लिक करा.
- यानंतर 'Begin Test' बटणावर क्लिक करून स्पीड टेस्टची प्रक्रिया सुरू करा.
- ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थोडं थांबा.
- Result सेक्शनमध्ये जाण्यासाठी आपल्याला अॅपमध्ये 3 हॉरिझॉन्टल बार्स दिसतील त्यावर क्लिक करा.
- यानंतर आपल्याला स्पीड टेस्टचा Result पाहायला मिळेल.
- Result वर क्लिक करून आपण स्पीड टेस्टची सविस्तर माहिती घेऊ शकता.
ट्रायच्या My Speed या अॅपच्या माध्यमातून आपल्याला स्पीडसोबतच कव्हरेज, नेटवर्क इन्फॉर्मेशन आणि डिव्हाइस लोकशनही चेक करता येणार आहे. ट्रायच्या मते, हे अॅप कोणत्याही प्रकारे युजर्सची माहिती संकलित करत नाही. स्पीड टेस्ट नंतर आपल्या टेलीकॉम सेवा पुरवठादार कंपनीकडे याची तक्रारही नोंदवू शकतो.