LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:23 PM2022-01-13T13:23:21+5:302022-01-13T13:25:37+5:30

LPG Gas Subsidy: तुमच्या बँक अकॉउंटमध्ये सबसिडी येत आहे कि नाही हे तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता. सबसिडी मिळत नसल्यास तुम्ही तक्रार देखील करू शकता.  

How to check lpg subsidy status online and where to complain  | LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार

LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार

googlenewsNext

LPG Gas Subsidy: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सतत वाढत असतात. दर महिन्याला नवीन दर लागू केले जातात. त्यामुळे त्यावर मिळणारी सबसिडी घरच्या बजेटला दिलासा देणारी असते. परंतु ही सबसिडी आपल्या बँक अकॉउंटमध्ये येते काई नाही हे कधी कधी समजत नाही. जर तुमच्या अकॉउंटमध्ये सबसिडीचे पैसे येत नसतील तर तुम्ही तक्रार देखील करू शकता.  

घरगुती एलपीजी सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक अकॉउंटमध्ये येत नसल्यास तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. यासाठी 18002333555 हा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. यावर सबसिडी संबंधित इतर तक्रारी देखील करता येतील. पंरतु तक्रार कारण्याआधी सबसिडी अकॉउंटमध्ये येत आहे कि नाही याची माहिती जर घ्या.  

एलपीजी सबसिडीच स्टेट्स कसं चेक करायचं 

  • सर्वप्रथम http://mylpg.in/ या वेबसाईट वर जा.  
  • इथे तुमचा 17 अंकी LPG ID दिल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर सबमिट करा.  
  • कॅप्चा कोड टाकून पुढे कंटिन्यू करा.  
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.  
  • पुढील पेजवर तुमचा ई-मेल आयडी लिहून पासवर्ड जेनरेट करा. 
  • ई-मेल वर एक अ‍ॅक्टीवेशन लिंक येईल, त्यावर क्लिक करा, लिंक क्लिक करताच तुमचं अकॉउंट अ‍ॅक्टिव्हेट होईल. 
  • अकॉउंट क्रिएट झाल्यावर तुम्ही mylpg.in वर जाऊन लॉग-इन करा. 
  • जर तुमचं आधार कार्ड LPG अकॉउंटशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करा.  
  • त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred पर्याय बघा. 
  • इथे तुम्ही तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या सबसिडीची माहिती मिळवू शकता.  

हे देखील वाचा:

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

फक्त 6299 रुपयांमध्ये आला भन्नाट स्मार्टफोन; Tecno Pop 5 LTE मध्ये आहे 5000mAh ची दणकट बॅटरी

Web Title: How to check lpg subsidy status online and where to complain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.