अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमधून वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच  

By सिद्धेश जाधव | Published: September 30, 2021 06:36 PM2021-09-30T18:36:28+5:302021-09-30T18:45:35+5:30

Online Shopping Tips And Tricks: पुढे आम्ही वेबसाईट आणि क्रोम एक्सटेंशनची माहिती देत आहोत, जे ई-कॉमर्स वेबसाईटवरील वस्तूंच्या किंमतीवर नजर ठेवतात आणि किंमत कमी झाल्याची सूचना देखील देतात.

how to check price history of a product of flipkart amazon and other e commerce site | अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमधून वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच  

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमधून वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच  

googlenewsNext

बऱ्याचदा आपण अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून वस्तू विकत घेतो आणि काही दिवसांनी त्या वस्तूची किंमत कमी होते. 3 ऑक्टोबरपासून या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु होणार आहेत. या सेलमध्ये वस्तूंची मागणी जास्त असते म्हणून अनेक सेलर या काळात किंमत कमी करण्याच्या ऐवजी वाढवतात. जेव्हा मागणी कमी होते तेव्हा त्या वस्तूंची किंमत कमी केली जाते. अशा वस्तू सेल आहे म्हणून किंवा डिस्काउंट मिळतोय म्हणून आपण विकत घेतो. त्यानंतर त्या वस्तूची किंमत कमी होते आणि आपल्याला फासल्यासारखे वाटते. यावर उपाय काय? चला जाणून घेऊया. 

पुढे आम्ही एक वेबसाईट आणि एका क्रोम एक्सटेंशनची माहिती देत आहोत. जे ई-कॉमर्स वेबसाईटवरील वस्तूंच्या किंमतीवर नजर ठेवतात आणि किंमत कमी झाल्याची सूचना देखील देतात. चला जाणून घेऊया खरीखुरी ‘बचत’ करणाऱ्या या टूल्स बद्दल.  

pricehistory.in  

योग्य दरात वस्तू घ्यायला कोणाला आवडत नाही. यात तुम्हाला pricehistory.in ही वेबसाईट मदत करू शकते. तुम्हाला जी वस्तू विकत घ्यायची आहे तिचे URL या वेबसाईटवर जाऊन पेस्ट करा. म्हणजे तुमच्या समोर त्या वास्तूच्या किंमतीचा संपूर्ण इतिहास समोर येईल. यावरून खरंच सेलर डिस्काउंट देत आहे का ते समजेल. Pricehistory चे अ‍ॅप देखील गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध आहे. इथून तुम्ही Amazon, Flipkart, Myntra, Tatacliq, Paytm Mall, Croma, Zivame, Nyka, Ajio आणि Koovs या साईटवरील वस्तूंच्या किंमतीचा इतिहास बघू शकता.  

Keepa  

Keepa हे एक प्रसिद्ध एक्सटेंशन आहे, जिथून अ‍ॅमेझॉनवरील वस्तूंच्या किंमतीचा इतिहास बघता येतो. तसेच या एक्सटेंशनचा वापर किंमत कमी झाल्याची सूचना मिळवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. हे एक्सटेंशन फायरफॉक्स, क्रोम, ऑपेरा, सफारी आणि एज ब्राउजरमध्ये वापरता येते. तसेच किपाचं अ‍ॅप देखील गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध आहे.  

ई-कॉमर्स वेबसाइटवरील फीचर्स  

थर्ड पार्टी एक्सटेंशन आणि वेबसाईटसह तुम्ही ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील प्राईस ड्रॉप म्हणजे किंमत कमी झाल्याची माहिती मिळवू शकता. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील प्राईस ड्रॉप अलर्टची पद्धत वेगळी आहे, तसेच काही प्लॅटफॉर्मवर हे फिचर उपलब्ध नसते.  

Web Title: how to check price history of a product of flipkart amazon and other e commerce site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.