तुमचं Instagram अकाऊंट हॅक झालंय का? काही स्टेप्समध्ये करा हॅकरला बाय बाय
By सिद्धेश जाधव | Published: December 18, 2021 07:57 PM2021-12-18T19:57:16+5:302021-12-18T20:19:38+5:30
Instagram मधील फिचरच्या मदतीनं तुम्ही तुमचं अकाऊंट इतर कोणी वापरत नाही ना हे बघू शकता. त्या व्यक्तीचा अॅक्सेस देखील तुम्ही काढून घेऊ शकता.
Instagram चा वापर सध्या फक्त फोटोज पोस्ट करण्या पुरता राहिलेला नाही. हा आता के लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. त्यामुळे अनेकांसाठी इंस्टाग्राम अकाऊंटचं महत्व वाढलं आहे. सध्या सायबर हल्ले वाढत आहेत, त्यामुळे लोकांना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता सतावत असते. अशात अकाऊंट हॅक होण्याची किंवा दुसऱ्या डिवाइसवर इंस्टाग्राम लॉगइन तसंच राहण्याची शक्यता आहे.
इन्स्टाग्राममध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट इतर कोणाच्या डिवाइसवर लॉग इन आहे का किंवा तुमचं अकाऊंट कोणी वापरत आहे का हे तुम्ही काही क्लिक्समध्ये बघू शकता. इतकंच नव्हे तर तुम्ही त्या युजरला लॉग आउट देखील करू शकता. पुढे आम्ही याची प्रोसेस दिली आहे.
How to logout Instagram Account from other device
- सर्वप्रथम Instagram अॅप ओपन करा.
- त्यानंतर प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
- आता उजवीकडे सर्वात वर असलेल्या तीन लाईन्सवर क्लिक करा.
- इथे अनेक ऑप्शन मिळतील. त्यात Setting च्या ऑप्शनवर क्लिक करा.
- नंतर Security वर क्लिक करा.
- त्यानंतर Login Activity वर क्लिक करा. आता तुमच्या समोर ते सर्व डिवाइस येतील, जिथे तुमचं अकाऊंट लॉग इन असेल. इथे त्या डिवाइसचं लोकेशन देखील मिळेल.
- आता तुम्हाला ज्या डिवाइसवरून लॉग आउट करायचं आहे, त्यासमोर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा आणि लॉग आउटवर क्लिक करून लॉग आउट करा.
- जर तुम्ही डिवाइस ओळखत नसाल आणि अकाऊंट हॅक झाल्याची शंका असेल तर अकाऊंट पासवर्ड बदलून तुम्ही अकाऊंट सुरक्षित करू शकता.