PAN Card हवा आहे का? काही मिनिटांत घरबसल्या डाउनलोड करा e-PAN कार्ड
By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2021 06:56 PM2021-06-30T18:56:12+5:302021-06-30T18:57:45+5:30
PAN कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे, तो हरवल्यास तुम्ही e-PAN Card चा वापर करू शकता.
आधारकार्ड नंतर Pan Card हा भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचा सरकारी दस्तवेज आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून Permanent Account Number म्हणजे PAN दिला जातो. पॅन प्लास्टिक कार्डच्या स्वरूपात जारी केला जातो. पॅन नसल्यास अनेक कामे थांबू शकतात. जर तुम्हाला त्वरित PAN Card हवा असेल तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून e-PAN Card डाउनलोड करू शकता. याची संपूर्ण माहिती मी पुढे दिली आहे.
e-PAN Card डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
e-PAN Card ऑनलाइन इन्कम टॅक्सच्या वेबसाईट वरून फक्त काही मिनिटांत डाउनलोड करता येईल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम Income Tax वेबसाइट www.incometax.gov.in/iec/foportal वर जा.
- आता या होम पेजवर Our Services मध्ये Show More वर क्लीक करा. तिथे असलेल्या Instant E PAN च्या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर Get New e-PAN वर जा आणि तुमचा Aadhaar नंबर टाका, I confirm that वर क्लीक करा आणि Continue वर क्लीक करा.
- आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो सबमिट करा. तुमच्या Aadhaar वरील माहिती व्हॅलिडेट करा. त्यानंतर तुमच्या पॅनवरील माहिती निवडा आणि सबमिट करा.
- आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या ई-मेल आयडीवर PDF फॉर्मेटमध्ये e-PAN पाठवला जाईल. तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता.