तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp वर एखाद्याचं व्हिडीओ स्टेटस आवडलंय? मग 'असं' करा पटकन डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:52 PM2021-04-03T15:52:33+5:302021-04-03T16:00:59+5:30

Whatsapp Video Status Download : कोणत्याही थर्ड पार्टी App ची गरज न घेता आता WhatsApp व्हिडीओ स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे.

how to download whatsapp video status easily follow step by step process third party app not required | तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp वर एखाद्याचं व्हिडीओ स्टेटस आवडलंय? मग 'असं' करा पटकन डाऊनलोड

तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp वर एखाद्याचं व्हिडीओ स्टेटस आवडलंय? मग 'असं' करा पटकन डाऊनलोड

googlenewsNext

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हाव म्हणून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. अनेकदा इतरांनी ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस हे आपल्या प्रचंड आवडतात. खासकरून व्हिडीओबाबत हे हमखास होत असतं. मात्र ते व्हिडीओ 24 तासांनंतर निघून जातात आणि आपल्या ते आपल्या फोनमध्येही ठेवता येत नाहीत. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. 

कोणत्याही थर्ड पार्टी App ची गरज न घेता आता WhatsApp व्हिडीओ स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस कसं ठेवायचं हे सर्वांनाच माहीत आहे पण ते डाऊनलोड कसं करायचं हे फार कमी लोकांना माहीत आहे. WhatsApp स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी कोणताही ऑप्शन दिसत नाही. त्यामुळे मित्रमैत्रिणींच्या स्टेट्सपैकी एखादा फोटो किंवा व्हिडीओ आपल्याला हवा असेल तर ते त्यांच्याकडे मागावं लागतं. पण एक पद्धत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहज WhatsApp स्टेट्सला डाऊनलोड करू शकता.

WhatsApp व्हिडीओ स्टेटस डाऊनलोडसाठी थर्ड पार्टी App ची नाही गरज 

- सर्वप्रथम व्हिडीओ स्टेट्सला ओपन करा हे तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे. यानंतर फोनच्या फाइल मॅनेजरमध्ये जा. हे प्रत्येक फोनमध्ये इनबिल्ट असतात.

- जर तुमच्या फोनमध्ये हे नसेल तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा. फाइल मॅनेजरच्या सेटिंगमध्ये जा.

- Show Hidden System Files सेटिंगला ऑन करा. मग पुन्हा फाइल मॅनेजरच्या होम पेजवर या. या ठिकाणी फोनची इंटरनल मेमरीचा पर्याय तुम्हाला दिसेल. यावर जा.

- WhatsApp फोल्डरच्या मीडिया फोल्डरला ओपन करा. या ठिकाणी तुम्हाला स्टेस्ट फोल्डर दिसेल. यात सर्व WhatsApp स्टेट्स दिसतील.

- ज्याला तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे. त्याला सिलेक्ट करून कॉपी करा. आणि इंटरनल स्टोरेजमध्ये पेस्ट करा. यानंतर स्टेट्सला तुम्ही कुणालाही सेंड करू शकता. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

लय भारी! Whatsapp आता Colourful होणार; चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, नवं फीचर कमाल करणार

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी कलरफूल होणार आहे. युजर्सना अ‍ॅपमधील रंग बदलता येणार असल्याची माहिती मिळत आहे. WaBetaInfo या वेबसाईटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप एका अशा फीचरवर काम करीत आहे जे युजर्सना अ‍ॅपमधील काही रंग बदलण्याची मुभा देईल. या फीचरवर सध्या काम चालू असून अधिकची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नव्या फीचरचे काही स्क्रीनशॉट देखील ट्विटरवरून शेअर करण्यात आले आहेत. या फीचरचा वापर करून युजर्स चॅटबॉक्समधील काही रंग बदलू शकतील. युजर्सना स्क्रीनवरील मजकूरासाठी डार्क ग्रीन किंवा लाईट ग्रीन कलरची पण निवड करता येईल.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: how to download whatsapp video status easily follow step by step process third party app not required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.