मिनिटांत स्टोरेज होईल फ्री, नको असलेली App होतील डिलीट; फोन फास्ट करण्यासाठी वापरा 'ही' ट्रीक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:41 PM2021-10-23T16:41:36+5:302021-10-23T16:41:55+5:30
वाचा कशी करू शकता तुमच्या मोबाईलमधील मेमरी फ्री.
अधिक स्टोरेज स्पेससह अनेक स्मार्टफोन व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. परंतु जर तुमच्या डिव्हाइसचं स्टोरेज स्पेस 128 जीबी किंवा 64 जीबीपेक्षा कमी असेल, तर अनेकदा हेवी गेम किंवा फाइल्स डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला 'आउट ऑफ स्टोरेज' हा मेसेज दिसू लागतो. Android स्मार्टफोन्सची चांगली गोष्ट म्हणजे त्यांना बरेच कस्टमायझेश ऑप्शन्स मिळतात. पण त्यांच्याबरोबर थोडी त्रासदायक गोष्ट म्हणजे हळूहळू फोनची इंटरनल मेमरी भरत राहते. तुम्ही काही सोप्या मार्गांनी इंटरनल स्टोरेज फ्री करून फोनचा परफॉर्मन्स सुधारू शकता.
अनेकदा आपल्याला फोनमध्ये सर्वच फाईल्स किंवा अॅप्स आवश्यक आहे आपण काहीच डिलीट करू नये असं वाटू शकतं. परंतु काही सिंपल क्लिनिंग टीप्ससोबत मेमरी थोडी फ्री करण्याचा एक चांगला मार्ग तुम्ही निवडू शकता.
कसं कराल स्टोरीज फ्री
- तुमच्या स्मार्टफोन्सच्या सेटिंग्समध्ये जा.
- त्या ठिकाणी असलेला Storage हा पर्याय निवडा.
- त्यानंतर फाईल कॅटेगरीची लिस्ट आणि किती स्टोरेज शिल्लक आहे हे तुम्हाला दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला 'Free Up Space' हे ऑप्शन दिसेल.
- त्या ठिकाणी तुम्हाला गुगल फाईल्स अॅप्स (Install असल्यास) किंवा Remove Items चा पर्याय पाहायला मिळेल.
- Remove Items फीचर तुम्हाला ज्या व्हिडीओ फोटोंना हटवण्याचं ऑप्शन देते ज्यांचं तुम्ही बॅकअप घेतलं आहे.
- याशिवाय डाऊनलोड करण्यात आलेल्या फाईल्स आणि कमी उपयोग करण्यात येणारे गेम्सही तुम्ही काढू शकता.
कॅश क्लिअर करा
फोनची बहुतांश मेमरी कॅशमध्ये वाया जाते. यासाठी सर्वात प्रथम कॅश क्लिअर करणं आवश्यक आहे. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन त्या ठिकाणी स्टोरेज या ऑप्शनमध्ये जा. या ठिकाणी तुम्हाला कॅश हा ऑप्शन दिसेल. हा ऑप्शन तुमची कोणतीही फाईल डिलीट करणार नाही.
याशिवाय स्मार्ट स्टोरेज टॉगल, स्मार्टफोनच्या स्टोरेजना फअरी करण्यासाठी अजून एक ऑप्शन आहे. जर स्मार्ट स्टोरेज टॉगल ऑन असेल तर डिव्हाईस 30-60-90 दिवसांनंतर बॅक अप करण्यात आलेले फोचो आपोआप हटवून टाकतो. याशिवाय स्टोरेज भरल्यानंतर बॅकअप केलेल्या फाईल्सही स्वत:हून डिलीट होतात.