व्हॉट्सअॅपवर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? मग असं करा स्वत:ला अनब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 11:05 AM2018-11-11T11:05:10+5:302018-11-11T11:22:06+5:30

ब्लॉक केलेलं असल्यास एकमेकांशी संवाद साधता येत नाही. अनब्लॉक केल्यावरच गप्पा मारणं अथवा चॅट करणं शक्य असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास स्वत:ला अनब्लॉक कसं करायचं हे जाणून घेऊया. 

How to get unblocked from all your WhatsApp 'enemies' | व्हॉट्सअॅपवर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? मग असं करा स्वत:ला अनब्लॉक

व्हॉट्सअॅपवर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? मग असं करा स्वत:ला अनब्लॉक

Next
ठळक मुद्दे व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय माध्यम आहे. ब्लॉक केलेलं असल्यास एकमेकांशी संवाद साधता येत नाही. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असल्यास त्या व्यक्तीचा डीपी, स्टेटस, लास्ट सीन असं काहीच दिसत नाही.

नवी दिल्ली -  व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय माध्यम आहे. एकमेकांशी पटकन कनेक्ट होण्याकरता या अॅपचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. मात्र एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की आपण लगेच त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करण्याचा निर्णय घेतो. मात्र ब्लॉक केलेलं असल्यास एकमेकांशी संवाद साधता येत नाही. अनब्लॉक केल्यावरच गप्पा मारणं अथवा चॅट करणं शक्य असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास स्वत:ला अनब्लॉक कसं करायचं हे जाणून घेऊया. 

WhatsAppवरील चॅटिंगची मज्जा आणखी होणार दुप्पट, लवकरच येणार 5 जबरदस्त फीचर्स

सर्वप्रथम तुमच्या मित्राने अथवा मैत्रिणीने तुम्हाला नक्की ब्लॉक केलंय का हे पाहा. साधारण एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असल्यास त्या व्यक्तीचा डीपी, स्टेटस, लास्ट सीन असं काहीच दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला जर हे दिसत नसेल तर नक्कीच तुम्हाला ब्लॉक केलं आहे. याशिवाय आणखी एक पद्धत आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का ते समजणार आहे. यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवा. जर एकच टिक दिसत असेल तर तुम्हाला ब्लॉक केलं आहे हे समजा. 

आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास असं करा स्वत: ला अनब्लॉक

- सर्वप्रथम व्हॉट्सअॅपच्या सेटींगमध्ये जा आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करा. 

- व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करण्यासाठी डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करा आणि नंतर आपला मोबाईल नंबर टाका. 

- मोबाईल नंबर देऊन अकाऊंट डिलीट करा आणि नंतर व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा. 

आता बनवा आपलं स्वतःचं व्हॉट्सअॅप स्टिकर, जाणून घ्या कसं...

- अनइन्स्टॉल केल्यावर फोन एकदा रिस्टार्ट करा. 

- प्ले स्टोअरवर जाऊन पुन्हा एकदा नव्याने व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा आणि पूर्ण माहिती द्या.

- यानंतर तुम्हाला ब्लॉक केलेल्या अकाऊंटने तुम्हाला अनब्लॉक केल्याचं दिसेल. 
 

Web Title: How to get unblocked from all your WhatsApp 'enemies'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.