Tech Tips: Facebook नं सादर केलं जबरदस्त फीचर; आता पोस्टवरील लाफिंग इमोजी येणार लपवता, जाणून घ्या पद्धत  

By सिद्धेश जाधव | Published: December 2, 2021 07:30 PM2021-12-02T19:30:40+5:302021-12-02T19:33:13+5:30

Tech Tips:Facebook नं पोस्टवरील रिअ‍ॅक्शन लपवण्याची फिचर दिलं आहे. हे फिचर युजर्सची प्रायव्हसीसाठी आणि सुरक्षेसाठी देण्यात आलं आहे.  

How to hide reaction count on your facebook post follow these steps and check all details  | Tech Tips: Facebook नं सादर केलं जबरदस्त फीचर; आता पोस्टवरील लाफिंग इमोजी येणार लपवता, जाणून घ्या पद्धत  

Tech Tips: Facebook नं सादर केलं जबरदस्त फीचर; आता पोस्टवरील लाफिंग इमोजी येणार लपवता, जाणून घ्या पद्धत  

googlenewsNext

Tech Tips: Facebook वर याआधी फक्त लाईकचं बटन होतं, त्यानंतर कंपनीनं रिअ‍ॅक्शन बटन्स जोडले. यामुळे पोस्टवर वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शन येऊ लागल्या. याचा अनेकांना फायदा झाला तर काहींना याचा तोटा देखील झाला. एकीकडं फक्त रिअ‍ॅक्शनचा आकडा बघून पोस्टची गुणवत्ता समजू लागली. तर दुसरीकडं ट्रोल्स या फीचरचा वापर युजर्सना त्रास देण्यासाठी करू लागले.  

त्यामुळे अनेकांना रिअ‍ॅक्शन काउन्ट चांगला वाटत नाही. आपल्या पोस्टवर येणाऱ्या रिअ‍ॅक्शनची संख्या त्यांना लोकांना दाखवायची नसते. जर तुम्हाला देखील तुमच्या फेसबुक पोस्टवरील रिअ‍ॅक्शन काउन्ट लपवायचा असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन हा बदल करू शकता. याची संपूर्ण पद्धत आम्ही पुढं सांगितली आहे.  

Facebook पोस्टवरील रिअ‍ॅक्शन काउन्ट लपवण्यासाठी 

  • Facebook App मध्ये उजवीकडे सर्वात वर असलेल्या तीन लाईन्स वर क्लिक करा. 
  • त्यानंतर सर्वात खाली स्क्रोल करून Setting and Privacy ऑप्शनवर क्लिक करा. 
  • मग Setting वर क्लिक केल्यावर समोर Preferences सेक्शन येईल. 
  • इथे Reaction Preferences वर क्लिक करा. 
  • त्यात Hide Number of Reaction चा ऑप्शन दिसेल. 
  • जर तुम्हाला दुसऱ्यांच्या पोस्टवर दिसणारा रिअ‍ॅक्शन काउन्ट लपवायचा असेल On Posts From other इनेबल करा.  
  • तसेच तुमच्या पोस्टवरील रिअ‍ॅक्शन काउन्ट लपवण्यासाठी On Your Posts टॉगल करा.  

 

Web Title: How to hide reaction count on your facebook post follow these steps and check all details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.