व्हॉट्सअॅपसारखाच Telegram चा लास्ट सीन लपवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 05:57 PM2021-02-06T17:57:13+5:302021-02-06T17:57:57+5:30
Telegram apps tips: व्हॉट्सअॅपने नवी पॉलिसी आणल्यानंतर सिग्नलप्रमाणे टेलिग्राम डाऊनलोड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे आता लोकांना टेलिग्राम कसे आहे, त्यातील 'लास्ट सीन' कसा लपवायचा याची माहिती हवी आहे.
व्हॉट्सअॅपने (WhatsApp) युजरच्या प्रायव्हसीचे नियम बदलल्याने त्याचा फायदा टेलिग्राम (telegram) अॅपला झाला आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीचा अनेकांनी धसका घेतला आहे. सुरक्षित असलेल्या इतर पर्यायांचा युजर्स सध्या शोध घेत आहेत. टेलिग्रामने एकूण 500 मिलियन अॅक्टिव्ह युजर्संचा आकडा सुद्धा पार केला आहे. व्हॉट्सअॅपने नवी पॉलिसी आणल्यानंतर सिग्नलप्रमाणे टेलिग्राम डाऊनलोड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे आता लोकांना टेलिग्राम कसे आहे, त्यातील 'लास्ट सीन' कसा लपवायचा याची माहिती हवी आहे. (how to hide telegram last seen like WhatsApp.)
व्हॉट्सअॅपसारखाच टेलिग्राम युजरनाही लास्ट सीन लपविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्हीदेखील व्हॉट्सअॅप्सडून टेलिग्राम वापरू लागला असाल तर तुमच्यासाठी हे फिचर कसे आहे ते सांगणार आहोत.
- सुरुवातीला टेलिग्राम अॅप ओपन करा.
- आता स्क्रीनच्या वरच्या डाव्या बाजुला हॅमबर्गर मेन्यू असेल त्यावर क्लिक करा.
- यानंतर आतमध्ये दिलेल्या सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा.
- सेटिंगमध्ये प्रायव्हसी आणि सिक्युरिटी ऑप्शनवर क्लिक करा.
- यानंतर लास्ट सीन ऑप्शनवर क्लिक करा.
- आता तुम्ही तुमचा लास्ट सीन कोण पाहू शकेल कोण नाही हे निवडू शकणार आहात. यासाठी एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नोबडी असे तीन पर्याय आहेत. सर्वांपासून लास्ट सीन हाईड करायचा असेल तर तुम्ही नोबडी सिलेक्ट करावा.
- यानंतर तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजुला चेक मार्क दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक मेसेज दिसेल. त्यावर तुम्ही ज्या लोकांसोबत लास्ट सीन शेअर करत नाही आहात, त्यांचाही लास्ट सीन तुम्हाला दिसणार नाही, असे त्यामध्ये लिहिलेले असेल. मात्र, तुम्हाला एका ठराविक काळाचा लास्ट सीन जरुर दिसणार आहे. जसे की, या आठवड्यात किंवा या महिन्यात.
- ही अट तुम्हाला मंजूर असल्यास तुम्ही ओकेवर क्लिक करा. यानंतर तुमचा लास्ट सीन हाईड होणार आहे.
व्हॉट्सअॅप धोक्याचेच...
गेल्या वर्षी फेब्रुवारीत Google आणि WhatsApp ची जोरदार चर्चा सुरू झाली होती. काही पब्लिक ग्रुप हे गुगल सर्चच्या रिझल्टमध्ये दिसत असल्याची त्याची चर्चा रंगली होती. या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅट आणि मेंबर इन्फो ही गुगल सर्चमध्ये पाहिली गेली होती. मात्र ही समस्या त्यानंतर दूर करण्यात आली होती. तसेच ग्रुप सुद्धा लपवण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा काही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.