काय सांगता? तुमच्या लॅपटॉपमध्ये येत असतील 'या' समस्या तर असू शकतो Virus अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 03:16 PM2021-12-16T15:16:32+5:302021-12-16T15:23:04+5:30
Laptop Virus : काम करताना अनेकदा लॅपटॉपमध्ये देखील समस्या येतात. लॅपटॉप स्लो चालतो. काही तांत्रिक अडचणींचा सामना करवा लागतो.
ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी काम करण्यासाठी लॅपटॉपचा वापर हा मोठ्याप्रमाणावर केला जातो. सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने सर्व काम लॅपटॉपवरच अवलंबून असतं. मात्र अनेकदा काम करताना लॅपटॉपमध्ये देखील समस्या येतात. लॅपटॉप स्लो चालतो. काही तांत्रिक अडचणींचा सामना करवा लागतो. काही वेळा लॅपटॉपमध्ये अनोळखी लिंक, साइट किंवा इनफेक्टेड Pen Drive द्वारे व्हायरस किंवा मालवेयर एन्ट्री करतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि व्हायरस अटॅकबाबत जाणून घेऊया...
- लॅपटॉप सतत अनस्टेबल होत असल्यास हा व्हायरसचा धोका असू शकतो.
- अचानकपणे लॅपटॉपमध्ये विचित्र मेसेज येत असल्यास किंवा एकही ड्राइव्ह योग्यरित्या अॅक्सेस करता येत नसल्यास हे व्हायरसचे संकेत असू शकतात.
- नेहमी लॅपटॉपमध्ये Run होणारे Heavy Application अचानक सुरू होत नसतील, चालत नसतील तर हा व्हायरसचा धोका असू शकतो.
- तुम्ही लॅपटॉपमध्ये कोणत्याही फाइलचा वापर करत नसाल, तरीही फाइल साइज सतत बदलत असल्यास, हा व्हायरस असल्याचा संकेत आहे.
- तुमच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्यास लगेच त्याबाबत तपास करुन योग्य ती एक्शन घ्या.
लॅपटॉप हॅक होऊन तुमची पर्सनल माहिती चोरी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशात 600 हून अधिक बेकायदेशीर कर्ज देणारे Apps; वेळीच व्हा सावध नाहीतर बसेल मोठा फटका
कर्ज देणारे अनेक अॅप हे सध्या अगदी सहज उपलब्ध आहेत. मात्र यातील अनेक अॅप हे फेक असून फसवणूक करणारे आहे. देशात सध्या 600 हून अधिक असे अॅप उपलब्ध असल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारने RBI च्या हवाल्याने युजर्सला 600 बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या Apps बद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे. हे App Store वर उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या फेक Apps विरोधात सरकारने केलेल्या सुधारात्मक कारवाईबाबत लोकसभेत एका लिखित उत्तरात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने IT मध्ये सांगितलेल्या प्रोसेसनंतर 27 बेकायदेशीर कर्ज देणारे Apps ब्लॉक केले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारी नोंदवण्यासाठी RBI ने Sachet या पोर्टलला जानेवारी 2020 ते मार्च 2021 पर्यंत डिजीटल कर्ज देणाऱ्या Apps विरोधात 2562 तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींमध्ये Apps द्वारे आकारलं जाणारं अतिरिक्त व्याज आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्रास दिल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या.