अॅपमुळे मोबाईल स्लो झालाय? मग 'हे' कराच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:25 PM2019-02-07T15:25:50+5:302019-02-07T15:34:28+5:30
स्मार्टफोनमध्ये असे अनेक अॅप असतात ज्याचा वापर केल्यानंतर ते तसेच फोनमध्ये असल्याने फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे अॅप अनइन्स्टॉल करा म्हणजे स्मार्टफोनचा स्पीड आणि बॅटरीची लाईफ वाढेल.
नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा अविभाज्य भाग झाल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. हाय परफॉर्मन्स आणि ग्राफीक्स असलेले नवनवीन अॅन्ड्रॉईड गेम्स आणि अॅप्स लॉन्च होत असतात. मात्र स्मार्टफोनमध्ये लिमिटेड स्टोरेज स्पेस असल्याने अनेकदा ते फोनमध्ये घेता येत नाहीत. यासाठी जास्त रॅम असलेले स्मार्टफोन खरेदी करणं हा एक पर्याय आहे. पण प्रत्येकालाच महागडा नवीन स्मार्टफोन घेणे शक्य नसते. बऱ्याचदा काही अॅन्ड्रॉईड अॅपमुळे स्मार्टफोनचा स्पीड कमी होतो. अॅपची सेटींग बदलून फोनचा स्पीड वाढवता येतो.
स्मार्टफोनमध्ये असे अनेक अॅप असतात ज्याचा वापर केल्यानंतर ते तसेच फोनमध्ये असल्याने फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे अॅप अनइन्स्टॉल करा म्हणजे स्मार्टफोनचा स्पीड आणि बॅटरीची लाईफ वाढेल. कोणत्या अॅपमुळे स्मार्टफोन स्लो होत आहे हे आधी जाणून घ्या. फेसबुकपासून इन्स्टाग्रामपर्यंत कोणते अॅप तुमच्या स्मार्टफोनची किती बॅटरी आणि रॅमचा वापर करतात ते सेटींगमध्ये जाऊन चेक करता येते. कोणता अॅप स्मार्टफोन स्लो करतो हे अशा पद्धतीने जाणून घ्या.
- स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जाऊन स्टोरेज किंवा मेमरीवर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर कोणता कन्टेट सर्वात जास्त मेमरी वापरतो याबाबत माहिती मिळेल. यामध्ये इंटरनल स्टोरेज कंजप्शन दिसणार आहे.
- मेमरीवर क्लिक केल्यानंतर मेमरी युज्ड बाय अॅप्समध्ये जा.
- त्यानंतर App Usage of RAM चार भागांमध्ये, 3 तास, 6 तास, 12 तास आणि 1 दिवस मध्ये लिस्ट दिसेल. याच्या मदतीने कोणते अॅप किती रॅम वापरतं याची माहिती मिळते.
स्मार्टफोनमधील ही लिस्ट पाहून तुम्ही स्मार्टफोन स्लो करणारे तसेच नको असलेले अॅप अनइन्स्टॉल करू शकता. तसेच काही लोकप्रिय अॅपचं लाइट व्हर्जन डाऊनलोड करण्याचा देखील पर्याय आहे जेणेकरून ते कमी स्टोरेज स्पेस वापरतील.