कमी कसल्या होतायत! स्मार्टफोनच्या किंमती वाढणार; एवढाच काळ हाती...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 04:00 PM2024-02-05T16:00:09+5:302024-02-05T16:00:45+5:30
नुकतीच स्मार्टफोनच्या स्पेअर पार्टच्या इंपोर्ट ड्युटीमध्ये ५ टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे हे स्मार्टफोन साडे सात ते पंधरा हजारांनी कमी होणार होते.
स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता असताना आता त्याची वाट पाहणाऱ्यांसाठी झटका देणारे वृत्त आहे. लवकरच स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. ही दरवाढ जून तिमाहीपासून होऊ शकते. म्हणजेच एप्रिल ते जून या काळात फोनच्या किंमती वाढू शकतात.
नुकतीच स्मार्टफोनच्या स्पेअर पार्टच्या इंपोर्ट ड्युटीमध्ये ५ टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे हे स्मार्टफोन साडे सात ते पंधरा हजारांनी कमी होणार होते. हे अद्याप झालेले नसताना आता दरवाढीची बातमी येत आहे.
चीनचे चलन युआन मजबूत स्थितीत आले आहे. जून 2023 मध्ये युआन 11.32 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता, डिसेंबरमध्ये ते 12.08 रुपयांपर्यंत वाढले. यामुळे मेमरी चिप्सच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन बनवण्याचा खर्च वाढू शकतो.
सॅमसंग आणि मॅक्रॉन सारख्या कंपन्या DRAM (मेमरी चिप्स) बनवतात. मार्च तिमाहीत त्यांच्या चिप्सच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढवणार आहेत. सध्या नवीन चिपसेटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मागणी वाढत आहे. त्यातच LPDDR5(X) च्या पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. यामुळे एप्रिलपर्यंत दोन महिनेच स्मार्टफोन कमी किंमतीत मिळण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारने कमी केलेल्या आयात करामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.