Aadhaar-Voter ID Linking: मतदान ओळखपत्राला आधार कार्ड असं करा लिंक; जाणून घ्या पद्धत
By सिद्धेश जाधव | Published: December 16, 2021 07:03 PM2021-12-16T19:03:06+5:302021-12-16T19:03:25+5:30
Aadhaar-Voter ID Linking: बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येणे रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लेखात आपण त्याची प्रोसेस जाणून घेणार आहोत.
Aadhaar-Voter ID Linking: मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आता PAN Card प्रमाणे मतदान ओळखपत्र देखील आधार कार्डशी लिंक करावा लागेल. यामुळे बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येण्यास आळा बसेल.
या निर्णयामुळे अनेकांना Voter ID Card आधार कार्डशी लिंक कसं करायचं याचा प्रश्न पडला आहे. या कामासाठी National Voter Service Portal आणि SMS असे दोन मार्ग अवलंबता येतील. या लेखात आपण या दोन पद्धती जाणून घेणार आहोत.
मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करण्यासाठी
- सर्वप्रथम https://voterportal.eci.gov.in/ या लिंकवर जाणून व्होटर पोर्टल ओपन करा.
- त्यांनतर इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी किंवा व्होटर आयडी कार्ड नंबर टाका.
- त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा
- पुढे तुमच्याकडे नाव, पत्ता, वडिलांचं नाव, राज्य, जिल्हा ही माहिती मागितली जाईल.
- ही माहिती भरल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करा.
- त्यांनतर समोर आलेल्या डेटाबेसमध्ये तुमची माहिती दिसेल.
- ही माहिती समोर आल्यानंतर डावीकडे दिलेल्या Feed Aadhaar No च्या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता एक पॉप-अप पेज समोर येईल. तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागेल.
- सर्वकाही भरल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा मेसेज येईल.
- महत्वाची सूचना या पोर्टलवर तुमचं अकॉउंट नसल्यास आधी अकॉउंट क्रिएट करावं लागेल.
SMS द्वारे करा आधार कार्डशी व्होटर आयडी कार्ड लिंक
< व्होटर आयडी कार्ड नंबर >< आधार कार्ड नंबर > या फॉर्मेटमध्ये 166 किंवा 51969 या नंबरवर SMS करून देखील तुम्ही व्होटर आयडी कार्डशी आधार लिंक करू शकता.