फेसबुकवरील फोटो आणि पोस्ट लपवायच्या आहेत का? मग अशाप्रकारे करा Facebook प्रोफाइल लॉक
By सिद्धेश जाधव | Published: August 17, 2021 07:42 PM2021-08-17T19:42:21+5:302021-08-17T19:42:48+5:30
जर तुम्हाला फेसबुकवरील तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट्स अनोळख्या लोकांपासून लपवून ठेवायचे असतील तर तुम्ही तुमचे फेसबुक प्रोफाइल लॉक करू शकता.
भारतातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मम्हणजे Facebook. या प्लॅटफॉर्मचा वापर युजर्स मित्र आणि कुटुंबियांशी ऑनलाईन संपर्कात राहण्यासाठी करतात. अनेकजण या सोशल मीडियाचा वापर अनोळखी लोकांशी मैत्री करण्यासाठी करतात. परंतु काही लोकांना अश्याच अनोळखी लोकांपासून लांब राहायचे असते. जर तुम्हाला देखील तुमच्या फेसबुक पोस्ट आणि फोटो अनोळखी लोकांपासून लपवायचे असतील तर तुम्ही फेसबुकच्या प्रायव्हसी फीचर्स वापर करू शकता.
फेसबुकवर कोणीही तुमचं नाव शोधून प्रोफाइल प्रोफाइल बघू शकतं. लोकांना असे करण्यापासुन रोखण्यासाठी तुम्ही प्रोफाइल लॉक करू शकता. प्रोफाइल लॉक केल्यावर कोणीही तुमचे फोटो बघू शकत नाही किंवा डाउनलोड करू शकत नाही. लॉक झालेल्या प्रोफाइलवरील पोस्ट, स्टोरीज, फोटोज आणि प्रोफाइल फोटो फक्त फ्रेंड लिस्टमधील मित्र मैत्रीणीना दिसतात.
Facebook Profile लॉक करण्यासाठी
- फेसबुकच्या मोबाईल अॅप आणि ब्राऊजरमधून सुद्धा तुम्ही प्रोफाइल लॉक करू शकता. पुढे दोन्ही पद्धती सांगितल्या आहेत.
- Mobile App मधून फेसबुक प्रोफाइल लॉक करण्यासाठी
- सर्वप्रथम Facebook अॅप ओपन करा. त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा.
- आता Edit Profile च्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. समोर आलेल्या ऑप्शन पैकी Lock Profile ऑप्शन निवडा.
- पुढल्या पानावर या फीचरची माहिती दिली जाईल. त्याच पेजवर खाली असलेल्या Lock My Profile वर क्लिक करा. म्हणजे तुमचं प्रोफाइल लॉक होईल.
ब्राऊजरमधून असे करा प्रोफाइल लॉक
लॅपटॉप ब्राउजरमध्ये फेसबुक प्रोफाइल लॉक करण्यासाठी कोणताही ऑप्शन मिळत नाही.
- तुम्हाला ब्राऊजरमध्ये m.facebook.com वर जाऊन तुमच्या प्रोफाइल पेजवर जावे लागेल.
- आता तुम्ही डेस्कटॉप मोडवरून मोबाईल व्हर्जनवर याला. आता तिथे मोबाईल प्रमाणे तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा आणि वर सांगितल्याप्रमाणे प्रोफाइल लॉक करा.
- iOS युजर देखील अश्याप्रकारे लॅपटॉपवरून प्रोफाइल लॉक करू शकतात.
प्रोफाइल अनलॉक कसे करावे?
जर तुम्हाला फेसबुक प्रोफाइल अनलॉक करायचे असेल तर वरील स्टेप्स फॉलो करा. जर तुम्ही प्रोफाइल लॉक केले असेल तर तुम्हाला Lock Your Profile च्या जागी Unlock your Profile चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही प्रोफाइल अनलॉक करू शकाल.