वेबकॅमविना टीव्हीवरून करता येणार व्हिडीओ कॉल; जियोने आणले भन्नाट फिचर
By सिद्धेश जाधव | Published: August 4, 2021 03:54 PM2021-08-04T15:54:02+5:302021-08-04T15:54:38+5:30
Jio Fibre Video Calling: कंपनीने Jio Fiber Voice मध्ये नवीन अपडेट दिला आहे. यामुळे जियोफायबर युजर TV स्क्रीनच्या माध्यमातून HD व्हिडीओ कॉल्स करू शकतील.
Reliance Jio सतत आपला ग्राहक वर्ग कायम राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नवनवीन सुविधा घेऊन येत असते. त्यानुसार कंपनीने अजून एक शानदार ऑफर Jio Fiber युजरसाठी सादर केली आहे. यामुळे जियो युजर थेट टेलिव्हिजनच्या मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकतील. यासाठी कंपनीने Jio Fiber Voice मध्ये नवीन अपडेट दिला आहे. यामुळे जियोफायबर युजर TV स्क्रीनच्या माध्यमातून HD व्हिडीओ कॉल्स करू शकतील.
तुम्हाला तर माहित आहे कि वेबकॅम किंवा कॅमेरा असलेले टीव्ही भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून जियोने वेबकॅम म्हणून स्मार्टफोनचा वापर करण्याचा अपडेट दिला आहे. Jio Fiber Voice च्या या TV कॉलिंग सुविधेत तुमचा मोबाईल कॅमेरा वेबकॅमचे काम करेल. मोठ्या स्क्रीनवर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हिडीओ कॉलद्वारे बघण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
TV वरून व्हिडीओ कॉल करण्यासाठी
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘JioJoin App’ डाउनलोड करा.
- अॅप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तिथे तुमचा JioFiber नंबर टाकून डिवायस कनेक्ट करा.
- जियोफायबर आणि जियोजॉईन अॅप लिंक झाल्यानंतर आता तुमचा स्मार्टफोन कम्पॅनियन डिवायस बनेल.
- आता तुमच्या फोनमधील JioJoin App च्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘Camera on Mobile’ फीचर ऑन करा.
- हे फीचर ऑन केल्यानंतर फोनचा कॅमेरा तुम्हाला वेबकॅमप्रमाणे वापरता येईल आणि घरातील टीव्हीवर तो कॉल व्हिडीओ सुरु राहील.
जियोजॉईन अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन्स आणि Jio Set-Top Box सह 6 डिवायसेज एकसाथ कनेक्ट करता येतात. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही स्मार्टफोन्सवर इन्स्टॉल करता येईल.