तुमच्या नावावर किती नंबर रजिस्टर्ड आहेत?; 'ही' ट्रिक वापरून माहिती घ्या अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:57 AM2022-12-15T11:57:55+5:302022-12-15T11:58:06+5:30

सध्या सिमकार्ड संबंधित अनेक फ्रॉड समोर येतात. त्यामुळे यूजर्सला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं

How many mobile numbers are registered in your name?; Get information using 'this' trick otherwise.. | तुमच्या नावावर किती नंबर रजिस्टर्ड आहेत?; 'ही' ट्रिक वापरून माहिती घ्या अन्यथा..

तुमच्या नावावर किती नंबर रजिस्टर्ड आहेत?; 'ही' ट्रिक वापरून माहिती घ्या अन्यथा..

Next

नवी दिल्ली - तुम्हाला माहित्येय का तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहेत? जर नाही तर आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर नोंद आहेत हे तुम्हाला कळू शकेल. एका आधार कार्डवर ९ मोबाईल नंबर रजिस्टर्ड केले जाऊ शकतात. परंतु अनेकदा आपल्या नावावर किती नंबर रजिस्टर्ड आहेत याची माहिती नसते. 

सध्या सिमकार्ड संबंधित अनेक फ्रॉड समोर येतात. त्यामुळे यूजर्सला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. जर तुमच्या नावावर रजिस्टर्ड असलेल्या सिम कार्डचा वापर करून काही बेकायदेशीर कृत्य झालं तर तुम्ही त्यात अडकू शकता. तुम्हाला जेलमध्येही जावं लागू शकतं. त्यासाठी ही ट्रिक माहिती असणं गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहेत ते कळू शकेल. आम्ही तुम्हाला ही ट्रीक सांगणार आहोत. त्याचसोबत तुम्ही अज्ञात नंबर तुमच्या नावावरून कसं हटवू शकता हेदेखील जाणून घेऊयात. 

तुमच्या नावावर किती नंबर रजिस्टर्ड?

  • सर्वात आधी तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in/  या वेबसाईटवर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला इथं दिलेल्या कॉलमवर स्वत:चा नंबर टाकावा लागेल. 
  • यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल. तो बॉक्समध्ये अपडेट करावा लागेल. 
  • लक्षात घ्या, ही सुविधा फक्त आंध्र प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, मेघालय, त्रिपुरा, मिझारोम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या यूजर्ससाठी उपलब्ध आहे. 
  • जर तुमच्या नावावर असा कुठलाही नंबर रजिस्टर्ड असेल ज्याची माहिती तुम्हाला नाही तर तुम्ही त्याचा रिपोर्ट सबमिट करू शकता. 
  • जसं तुम्ही Action बटणवर क्लिक कराल तसं तुम्हाला ३ पर्याय समोर दिसतील. ज्यात This is not my Number. Not Required, Required याचा समावेश असेल. त्यातील तुम्ही This is not my Number वर क्लिक करा आणि रिपोर्टवर सबमिट करा. 
     

Web Title: How many mobile numbers are registered in your name?; Get information using 'this' trick otherwise..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.