सावध व्हा...! उन्हाळ्यात किती नंबरवर ठेवावे फ्रिजचे रेफ्रिजरेशन; ही चूक केली तर ब्लास्ट होऊ शकतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:43 IST2025-02-19T12:42:25+5:302025-02-19T12:43:11+5:30

एसीसारखाच फ्रिजसाठीही थोडे लक्ष द्यावे लागेल, नाहीतर मीटर धावत सुटेल आणि बिल येईल.

How much should you set the refrigerator's refrigeration to in summer; If you make this mistake, it can cause a blast... | सावध व्हा...! उन्हाळ्यात किती नंबरवर ठेवावे फ्रिजचे रेफ्रिजरेशन; ही चूक केली तर ब्लास्ट होऊ शकतो...

सावध व्हा...! उन्हाळ्यात किती नंबरवर ठेवावे फ्रिजचे रेफ्रिजरेशन; ही चूक केली तर ब्लास्ट होऊ शकतो...

उकाडा वाढू लागला आहे, अनेकजण घरातील एसी साफ करून घेत असतील. एसी नीट साफ केला नाही तर त्याच्या कुलिंगवर परिणाम होतो, मग लाईट बिलही जास्त येते. परंतू, तुमच्या घरातील फ्रिजचे काय? आजकाल प्रत्येक घरात फ्रिज आहे. कोणाकडे सिंगल डोअर, कोणाकडे डबल डोअर आहे. या फ्रिजचेही वातावरणानुसार सेटिंग करावे लागते, नाहीतर स्फोट झाला म्हणून समजा...

एसीसारखाच फ्रिजसाठीही थोडे लक्ष द्यावे लागेल, नाहीतर मीटर धावत सुटेल आणि बिल येईल. याहून धोकादायक जर बाहेरच्या तापमानाप्रमाणे आतील तापमान ठेवले नाही तर एसीचा कॉम्प्रेसर सुरु राहून तुम्हाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अनेकदा फ्रिजचा स्फोट झाल्याचे ऐकले असेल. 

अनेकांच्या फ्रिजमध्ये फ्रिजरचे आणि फ्रिजचे वेगवेगळे सेटिंग असते. अनेकांना आपला फ्रिज कोणत्या नंबरवर ठेवावा हे माहिती नसते. उन्हाळ्यात, हिवाळ्यासाठी आणि पावसाळ्यासाठी वेगवेगळे तापमान असते. उन्हाळ्यात खाद्यपदार्थ लवकर खराब होतात, यामुळे उकाड्याची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून फ्रिजचा कॉम्प्रेसर सतत काम करत असतो. तापमान वाढवून ठेवले तर कॉम्प्रेसरला सतत काम करावे लागते. यामुळे स्फोट होऊ शकतो. 

उन्हाळ्यात फ्रिज ३ ते ४ नंबरवर ठेवावा. जेणेकरून खूप जास्त थंड नाही, खूप कमी थंड नाही असे वातावरण तयार राहते. थंडीमध्ये फ्रिजचे सेटिंग १ नंबरवर ठेवावे. थंडीच्या काळात अनेकजण फ्रिज बंद मध्ये मध्ये करून ठेवतात. जे चुकीचे आहे. तसेच बराच काळ फ्रिज बंद केला तर त्याचा कॉम्प्रेसर जाम होऊ शकतो आणि चालू करताच तापून बिघडू शकतो. 

फ्रिजची दुरुस्ती करताना अनेकदा पैसे वाचतात म्हणून किंवा दुरुस्त करणारा लोकल पार्ट वापरतो. यामुळे स्फोट होऊ शकतो. कॉम्प्रेसरची कंपनीच्या माणसाकडूनच दुरुस्ती करून घ्यावी आणि ओरिजिनल पार्ट वापरावेत. यामुळे फ्रिजच्या नादुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नका. 

Web Title: How much should you set the refrigerator's refrigeration to in summer; If you make this mistake, it can cause a blast...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.