इंटरनेटवर तुम्ही किती वेळ घालवता?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 12:19 PM2023-11-26T12:19:47+5:302023-11-26T12:20:10+5:30
Internet: अन्न, वस्त्र, निवारा हे आतापर्यंत मानवाच्या मूलभूत गरजा म्हटल्या जात होत्या. परंतु, यापैकी एखादी बाब नसली तरी चालेल, पण इंटरनेट हवेच, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
- ऋषिराज तायडे
(उपसंपादक)
अन्न, वस्त्र, निवारा हे आतापर्यंत मानवाच्या मूलभूत गरजा म्हटल्या जात होत्या. परंतु, यापैकी एखादी बाब नसली तरी चालेल, पण इंटरनेट हवेच, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. माफक आणि सहज उपलब्ध असलेल्या डेटामुळे आपल्यापैकी अनेकांचा दिवसांतील बराच वेळ इंटरनेटवर खर्ची होत आहे. जगभरात डेटाचा वापर आणि त्यामुळे खर्च होणाऱ्या वेळेबाबत काही रंजक माहिती पुढे आली आहे.