...तर तुमच्या FB Live वर हमखास होईल वॉव, लव्ह, लाईक्सचा वर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 07:16 PM2020-05-28T19:16:57+5:302020-05-28T19:25:22+5:30
Facebook Live Tips in Marathi: व्हिडीओ फक्त व्यावसायिक आणि रूक्ष करू नका. याउलट तुमची भाषा नैसर्गिक आणि उत्स्फूर्त ठेवा .
>> शिल्पा कुलकर्णी - मोहिते
लाइव्हची तयारी : प्रत्यक्ष ऑनलाइन जाण्याआधी तुम्ही कुठल्या विषयावर आणि किती बोलणार आहात, याची रुपरेखा तयार करावी. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की फेसबुक लाइव्हचा कालावधी साधारण १८ ते २० मिनिटांच्या आत बसवण्याचा प्रयत्न करावा.
व्हिडीओचे नाव : व्हिडीओला कुतूहल वाढेल अशा प्रकारचे नाव द्या. उदाहरणार्थ तुम्ही लाईव्हमध्ये कुठल्या विषयाबद्दल बोलणार आहात, त्यामुळे श्रोत्यांच्या कुठल्या समस्या दूर होऊ शकतील किंवा ज्याचे उत्तर लोकांना ऐकायला आवडेल असा प्रश्नदेखील व्हिडीओच्या नावामध्ये वापरता येईल.
श्रोते जमवा : जाण्याआधी पोस्ट लिहून तुमच्या फॉलोअर्सना जॉइन होण्यासाठी आमंत्रित करा. यासाठी ओळखीच्या लोकांना टॅग करता येईल.
व्हिडीओची सुरुवात : व्हिडीओची सुरुवात चांगली झाली तरच श्रोता पुढील लाइव्हमध्ये रस घेईल. त्यामुळे सुरूवातीचा वेळ श्रोत्यांची वाट बघण्यात आणि कॅमेरा चेक करण्यात वाया घालवू नका. आधी विषयाची ओळख करून द्या. त्यानंतर तुमची विश्वासार्हता प्रस्थापित करा. लाइक, हार्ट, वाऊ फेस अशा फेसबुक लाइव्हच्या भाषेत बोलायला शिका.
उत्सफूर्त आणि नैसर्गिक भाषा : व्हिडीओ फक्त व्यावसायिक आणि रूक्ष करू नका. याउलट तुमची भाषा नैसर्गिक आणि उत्स्फूर्त ठेवा आणि शक्य तिथे योग्य प्रमाणात विनोद बुद्धीचा वापर करून मनोरंजन करा.
लाइव्ह पूर्ण संपायच्या आधी मात्र ‘कॉल टू अॅक्शन’ अर्थात ‘पुढे काय’ हे सांगायला विसरू नका. लाइव्ह संपल्यावर जे लोक सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी पूर्ण व्हिडीओ पुन्हा पोस्ट करता येतो.
कोरोनामुळे जग बुडाले; पण फेसबुकचा मार्क झकरबर्ग मालामाल झाला
कर्मचाऱ्यांनो! पुढची १० वर्षे घरूनच काम करा, काही हरकत नाही; मार्क झकरबर्गची घोषणा
पोस्टची रिच वाढवताना...
खरंतर फेसबुकवर पोस्ट करणे विनामूल्य असते आणि जर पोस्ट पब्लिक असेल तर प्रत्येक फेसबुक युजरपर्यंत पोहोचू शकते, मग त्या पोस्टची रीच वाढवण्यासाठी पैसे का द्यावे? फेसबुक किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियामध्ये इतकी मोठी उलथापालथ होण्याचे एक कारण म्हणजे यातील बहुतांश मंच विनामूल्य आहेत.
फेसबुकवर पैसे न देता देखील तुम्ही तुमची पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचवू शकता. पण या गर्दीत तुम्हाला जर तुमच्या ब्रँडला सुप्रसिद्ध करायचे असेल तर कधीकधी सशुल्क जाहिरात करणे गरजेचे ठरू शकते. तुमचे पेज खूप प्रसिद्ध असल्याशिवाय त्याला हजारो फॉलोअर्स असल्याशिवाय पोस्टची नैसर्गिकरित्या होणारी रीच पुरेशी नसते, तसेच ती पोस्ट तुमच्या संभाव्य ग्राहकाच्या न्यूज फीडपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असू शकते. जेव्हा आपण पोस्टचा प्रचार करण्यासाठी फेसबुकला पैसे देतो, तेव्हा आपण केवळ फॉलोअर्सच्या न्यूजफिड्सवरच नाही तर व्यवसायात विशेष रस असणाऱ्या अनोळखी लोकांच्या न्यूजफिड्सवर तुमची दृश्यमानता वाढवितो.
फेसबुकवर अॅडव्हर्टाइज करून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय वैयक्तिक अकाउंटकडे नसून केवळ पेज धारकांकडेच आहे. याला फेसबुकच्या भाषेत पोस्ट ‘बूस्ट’ करणे असे म्हणतात. कुठल्याही प्रकारची पोस्ट बूस्ट करताना तीन मुख्य मुद्दयांवर विचार करणे गरजेचे असते.
सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड
TikTok ला टक्कर देणारं इंडियन अॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड
१. टार्गेट ऑडियन्स : तुमची पोस्ट कोणासाठी आहे हे ठरवणे खूप गरजेचे आहे. फेसबुकवर असलेल्या करोडो लोकांमध्ये कुठल्या प्रदेशातील, कुठल्या वयोगटातील आणि कुठल्या आवडी असणाऱ्या लोकांना तुमच्या पोस्टकडे आकर्षित करायचे आहे हे बूस्ट करताना ठरवावे लागेल. याला टार्गेट ऑडियन्स असे म्हणतात. शक्यतो हा गट मध्यम ठेवल्यास अधिक चांगला प्रतिसाद मिळू शकेल.
२. वेळ व पैस यांच्या विनियोगाची योजना : दररोज ७५ रुपये इतक्या कमी बजेटमध्ये देखील तुम्ही पोस्ट बुस्ट करू शकता.
३. कालावधी : बूस्ट किती दिवसांसाठी सुरू ठेवायची आहे हे देखील ठरवता येते. एक दिवस, आठवडा, ठरावीक दिवस किंवा तुम्ही स्वत:हून बंद करेपर्यंत जाहिरात सुरू ठेवू शकता. जाहिरातीवर किती खर्च करायचा आहे यावर तुम्हाला पूर्ण नियंत्रण ठेवता येते. ग्राहकांची गरज, वेळ आणि मार्केटिंग स्ट्रॅटजी या सगळ्यांचा विचार करून काही निवडक पोस्ट बूस्ट करण्यासाठी निवडाव्या. फोटोच्या २० टक्केहून अधिक जागेत शब्द असल्यास, तुमची पोस्ट बूस्ट होणार नाही. फेसबूकमध्ये व्हिडीओदेखील बूस्ट करता येतो. फेसबूकनुसार ५ ते १५ सेकंदांचा संक्षिप्त व्हिडीओ अधिक पहिला जातो.
(लेखिका टेक्नोक्रॅट आहेत.)
संकलन : स्नेहा पावसकर