WhatsApp कॉल रेकॉर्ड करायचाय? Android आणि iPhone मध्ये यासाठी नेमकं काय करायचं, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 12:58 PM2021-03-13T12:58:39+5:302021-03-13T13:07:20+5:30

Whatsapp Call Record : अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्हींमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ती जाणून घेऊया...

how to record whatsapp call on android and iphone | WhatsApp कॉल रेकॉर्ड करायचाय? Android आणि iPhone मध्ये यासाठी नेमकं काय करायचं, जाणून घ्या

WhatsApp कॉल रेकॉर्ड करायचाय? Android आणि iPhone मध्ये यासाठी नेमकं काय करायचं, जाणून घ्या

googlenewsNext

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा महत्त्वाचे कॉल हे फोनमध्ये रेकॉर्ड केले जातात. फोनमध्ये ती सुविधा देण्यात आलेली असते. हल्ली व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम झालं आहे. फक्त मेसेजिंग नाही तर व्हिडीओ कॉलिंग आणि व्हाईस कॉलिंगसाठी देखील हमखास व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्ना कॉल रेकॉर्ड करता येत नाही. तशी सुविधाच नाही. पण आता काळजी करू नका, युजर्ससाठी एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्याच्या काही पद्धती आहेत. अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्हींमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ती जाणून घेऊया...

iPhone मध्ये असा रेकॉर्ड करा WhatsApp कॉल

- आयफोन (iPhone) मध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करणं थोडं अवघड आहे. 

- व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल असेल तर सहज रेकॉर्ड करता येतो. पण ऑडिओ कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला मॅक किंवा एक्स्ट्रा फोनची गरज पडते. ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप नाही.

- कॉल रेकॉर्ड करण्यासाठी आयफोनला मॅकसोबत लाइटनिंग केबलने कनेक्ट करा.

- जर तुम्ही पहिल्यांदा दोन्ही डिव्हाईसला कनेक्ट करीत असाल तर Trust This Computer च्या नोटिफिकेशनवर क्लिक करावे लागेल.

- मॅकवर QuickTime ला ओपन करा. यानंतर फाइलमध्ये जाऊन न्यू ऑडिओ रिकॉर्डिंग वर क्लिक करा.

- ज्यावेळी तुम्ही QuickTime मध्ये रेकॉर्ड़ बटणवर जाल. त्या बटणमोर एक अ‍ॅरो खालील बाजुने पॉइंट करताना दिसेल. या ठिकाणी आयफोनच्या ऑप्शनची निवड करा.

-QuickTime मध्ये रेकॉर्ड बटणला टॅप करा. आता आयफोनवरून एक्स्ट्रा फोनवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल करा.

- कॉल कनेक्ट झाल्यानंतर अ‍ॅप युजरच्या आयकॉनची निवड करा. ज्याला तुम्हाला कॉल करायचा आहे. फोन केल्यानंतर कॉल डिस्कनेक्ट करा. QuickTime ची रेकॉर्डिंग बंद करा. फाईल मॅकवर सेव्ह करा.

Android फोन मध्ये WhatsApp कॉल असा करा रेकॉर्ड

- अँड्रॉईड फोनवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला एका थर्ड पार्टी सॉफ्टवेअरची गरज पडेल. याला तुम्ही प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता.

- Cube Call Recorder असं या सॉफ्टवेअरचं नाव आहे. याच्यामदतीने VoIP कॉल देखील रेकॉर्ड करू शकता. पण हे सर्व डिव्हाईसवर काम करू शकत नाही.

- Cube Call Recorder अ‍ॅपला इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. ज्या व्यक्तीला कॉल करून त्याची रेकॉर्डिंग करायची आहे. त्याला कॉल करा.

- जर बोलत असताना Cube Call विजेट शो होत असेल आणि लाईट येत असेल तर हे व्यवस्थित काम करीत आहे.

- जर एरर मेसेज येत असेल तर Cube Call Recorder च्या सेटिंगमध्ये जाऊन Force VoIP call as voice call वर क्लिक करा. जर या दरम्यान Cube Call विजेट शो होत असेल तर हे काम करीत आहे. जर एरर येत असेल तर फोन काम करीत नाही.

- व्हॉट्सअ‍ॅप कॉलला रेकॉर्ड केल्यानंतर दुसऱ्या फोनची मदत घेता येवू शकते. यात व्हॉट्सअ‍ॅप कॉलला स्पीकरवर ठेवू शकता. दुसऱ्या फोनची व्हाईस रेकॉर्डिंग ऑन करा. मात्र हे लक्षात ठेवा की, तुमच्या आजुबाजुला कोणताही आवाज येता कामा नये. तरच रेकॉर्डिंग व्यवस्थित येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: how to record whatsapp call on android and iphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.