Google Photos मधून डिलीट झालेले फोटो असे करा रिस्टोर; जाणून घ्या पद्धत
By सिद्धेश जाधव | Published: August 31, 2021 07:41 PM2021-08-31T19:41:12+5:302021-08-31T19:41:58+5:30
How To Restore Deleted Google Photos: गुगल फोटोजमधून चुकून डिलीट झालेले फोटोज किंवा व्हिडीओज डिलीट झाल्यास गोंधळून जाण्याचे कारण नाही. तुम्ही सहज डिलीट केलेले फोटोज आणि व्हिडीओज रिस्टोर करता येतील.
फोटोज आणि व्हिडीओज बॅकअप ठेवण्यासाठी अँड्रॉइडसह आयओएस युजर देखील Google Photos चा वापर करतात. ही गुगलची क्लाऊड स्टोरेज सेवा आहे. परंतु कधी कधी या ऑनलाईन स्टोरेजमध्ये साठवून ठेवलेले फोटोज किंवा व्हिडीओ चुकून डिलीट होतात. असे झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. Google Photos वरून डिलीट झालेल्या फाईल्स Trash फोल्डरमध्ये जातात. त्यामुळे डिलीट झालेले फोटो कायमस्वरूपी डिलीट होण्याआधी 60 दिवस या फोल्डरमध्ये राहतात. इथून या फाईल्स रिकव्हर करता येतात. फक्त यासाठी Google Photos चे Back UP आणि Sync आधीच फीचर एनेबल असले पाहिजे.
Google Photos मधून डिलीट झालेले फोटो कसे रिकव्हर करायचे
सर्वप्रथम गुगल फोटोजच्या Trash Folder मध्ये जाऊन तिथे तुम्ही डिलीट केलेला फोटो किंवा व्हिडीओ आहे कि नाही बघा. ट्रॅश फोल्डरमध्ये नसलेली मीडिया फाईल रिस्टोर करता येत नाही. तसेच ज्या फोटोचा तुम्ही बॅकअपच घेतला नाही आणि तो जर फोन मेमरीमधून डिलीट केला तरी देखील तो फोटो रिस्टोर करता येणार नाही. Trash Folder मधील फोटो रिस्टोर करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- Android आणि iOS डिवाइसवरून फोटो रिस्टोर करण्यासाठी Google Photos App ओपन करा.
- त्यानंतर सर्वात खाली Libary च्या ऑप्शनवर क्लिक करा आणि Trash Folder मध्ये जा.
- जो फोटो किंवा व्हिडीओ रिस्टोर करायचा आहे तो शोधा. आता त्या फोटो किंवा व्हिडीओला टच आणि होल्ड करून सिलेक्ट करा. एकापेक्षा जास्त फोटोज असल्यास त्या सर्व मीडिया फाईल सिलेक्ट करा.
- आता स्क्रीनवर खालच्या बाजूला Restore ऑप्शन दिला असेल त्यावर क्लिक करा.
- हा फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा तुमच्या फोनच्या फोटो गॅलेरी अॅप आणि अल्बम मध्ये येईल.
कम्प्यूटरवरून गुगल फोटोजमधील फोटो रिस्टोर करण्यासाठी
- सर्वप्रथम ब्राउजरमधून photos.google.com ओपन करा.
- तिथे डावीकडे Trash Folder वर क्लिक करा.
- जो फोटो किंवा व्हिडीओ रिस्टोर करायचा असेल तो सिलेक्ट करा.
- त्यानंतर Restore वर क्लिक करून तो फोटो गुगल फोटो लायब्ररी मध्ये किंवा अल्बममध्ये रिस्टोर करा.