QR code स्कॅन करुन व्हॉट्सअॅपवर कसा सेव्ह कराल कॉन्टॅक्ट? जाणून घ्या नवं फिचर...

By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 11:10 AM2020-12-27T11:10:55+5:302020-12-27T11:12:21+5:30

तुमच्या स्मार्टफोनमध्ये OR code तयार करणं आणि तो स्कॅन कसा करायचा? जाणून घेऊयात...

how to save contact on WhatsApp by scanning QR code Learn new features | QR code स्कॅन करुन व्हॉट्सअॅपवर कसा सेव्ह कराल कॉन्टॅक्ट? जाणून घ्या नवं फिचर...

QR code स्कॅन करुन व्हॉट्सअॅपवर कसा सेव्ह कराल कॉन्टॅक्ट? जाणून घ्या नवं फिचर...

googlenewsNext
ठळक मुद्देव्हॉट्सअॅपच नवं भन्नाट फिचर QR Code स्कॅन करुन करता येईल कॉन्टॅक्ट सेव्हस्मार्टफोनमध्ये नंबर सेव्ह करण्यासाठी आता सोपी पद्धत

नवी दिल्ली
WhatsApp वर आता QR कोडच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट सेव्ह करणं सोपं झालं आहे. याआधी नव्या कॉन्टॅक्ट नंबरला मेसेज पाठविण्याआधी संबंधित व्यक्तीचं नाव सेव्ह करावं लागायचं. पण आता WhatsApp QR Codes ला आता अँड्रॉइड आणि iOS अॅपमध्ये सहजपणे स्कॅन करता येऊ शकतं. 
तुमच्या स्मार्टफोनमध्ये OR code तयार करणं आणि तो स्कॅन कसा करायचा? जाणून घेऊयात...

अँड्रॉईडवर QR code तयार आणि स्कॅन कसा करायचा?

>> व्हॉट्सअॅप उघडून त्यात सर्वात वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा

>> यानंतर Settings ऑप्शनवर क्लिक करा

>> सेटिंग मेन्यूमध्ये उजव्या बाजूला QR Code चा पर्याय दिसेल.

>> QR Code मध्ये My Code आणि Scan Code असे पर्याय दिसतील. 

>> यात My Code पेजचा स्क्रिनशॉट घेऊन तो तुम्ही शेअर करु शकता किंवा तुमचा कॉन्टॅक्ट अॅड करण्यासाठी समोरच्या युझरला तुमचा कोड स्कॅन करायला सांगू शकता. 

>> आता QR Code स्कॅनर ओपण करण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीचा QR Code स्कॅन करण्यासाठी Scan Code पेजचा वापर करता येईल. 

>> एकदा कोड स्कॅन झाला की आपोआप समोरच्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट सेव्ह होऊन जातो. 

>> जर तुमच्याकडे कोडचा स्क्रीनशॉट असेल तर तो Scan Code पेजवर गॅलरी आयकनवर क्लिक करु शकता. यात तुम्ही स्कॅन करण्यासाठी कोडला सिलेक्ट करु शकता. 

iPhone वर QR Code तयार आणि स्कॅन कसं कराल?

>> व्हॉट्सअॅप सुरु करुन खालच्या बाजूस असलेल्या Setting मध्ये जा. 

>> तुमच्या नावाच्या बाजूला दिसत असलेल्या OR Code वर क्लिक करा

>> QR Code पर्यायात गेल्यानंतर  if you want to show your QR code आणि do you want to scan a code असे दोन पर्याय दिसतील. तुमच्या आवश्यकतेनुसार एका पर्यायाची निवड करा

>> जर तुम्हाला असं वाटतंय की व्हॉट्सअॅप QR Code अनेक लोकांपर्यंत पोहोचला आहे. तर तुमच्या व्हॉट्सअॅपवर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करुन My Code वर जा. यात तुम्ही Reset QR code हा पर्याय निवडून तुमचा QR Code बदलून घेऊ शकता. 
 

Web Title: how to save contact on WhatsApp by scanning QR code Learn new features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.