अलर्ट! Wi-Fi राऊटरचा वापर करता?; मग 'ते' सायबर हल्ल्यांपासून कसं सुरक्षित ठेवायचं, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:10 PM2021-04-22T15:10:58+5:302021-04-22T15:14:32+5:30
How To Secure Wi-Fi Router Cyber Attacks : राऊटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं.
नवी दिल्ली - माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विविध स्त्रोतांकडून तक्रारी येत आहेत, ज्यामध्ये भारताबाहेरील सर्व्हरसाठी अनधिकृतपणे डेटा चोरी करुन अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारला या आरोपांबाबत सविस्तर माहिती नसली, तरी सुरक्षेबाबत विचार करायला लावणारी ही बाब आहे. भारतात काम करणाऱ्या लोकांसाठी राऊटरच्या (Router) रुपात ही मोठी समस्या ठरू शकते.
राऊटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. राऊटर वायफाय (Wi-Fi) नेटवर्कपर्यंतचा प्रवेश नियंत्रित करतो आणि या माध्यमातून युजर्सच्या फोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इतर डिव्हाईसपर्यंत पोहचतो. जर एखाद्याला तुमच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्या नेटवर्कशी कनेक्ट असलेल्या डिव्हाईसवर प्रवेश मिळवण्यात आणि कनेक्ट होण्यास वेळ लागणार नाही.
लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हॅकर्स लढवताहेत नानाविध शक्कल https://t.co/vp7t557aiE#technology#apps#Hackers#Hacking
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2021
राऊटर असं करा सुरक्षित
राऊटर सुरक्षित करता येऊ शकतं, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. Settings मध्ये Network and Internet मध्ये जावं लागेल. त्यानंतर View your Network Properties त्यानंतर DNS Servers > IP Address वेब ब्राऊजरमध्ये कॉपी करावा लागेल. राऊटर सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला-स्ट्राँग पासवर्ड (Password) सेट करावा लागेल. प्रत्येक राउटरला दोन पासवर्ड असतात, एक सेटिंग्ज आणि दुसरा WPA एक्सेस पासवर्ड. हे दोन्ही पासवर्ड बदलू शकता. हा पासवर्ड लक्षात ठेवावा लागेल, वायफाय राऊटर एक्सेस करावा लागल्यास, पासवर्डची पुन्हा गरज लागते. त्यामुळे स्ट्राँग पासवर्ड ठेवून राऊटर सुरक्षित ठेवता येऊ शकतं.
अलर्ट! फोन हॅक करणारा WhatsApp मेसेज तुफान व्हायरल, वेळीच घ्या खबरदारी; हॅकिंगचा आणखी एक नवा प्रकार उघडhttps://t.co/8HFr2F43Am#WhatsApp#WhatsAppPink#Hackers#hacking#technology
— Lokmat (@MiLOKMAT) April 20, 2021
...तर पिंक कलरचं होईल WhatsApp! असा मेसेज तुम्हालाही आलाय?; चुकूनही करू नका क्लिक, फोन होतोय हॅक
व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचण्याकडे युजर्सचा कल असतो. हे हेरूनच हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन प्रकार आणला आहे. जाणून घेऊया... व्हॉट्सॲपचा बॅकग्राऊंड रंग हिरवा आहे. हा रंग बदलून तो पिंक करायचे असेल तर व्हॉट्सॲप पिंक नावाची लिंक येते. हे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर असल्याचा उल्लेखही या लिंकमध्ये असतो. अर्थातच ही लिंक क्लिक करण्याचा मोह वापरकर्त्याला होतो. व्हॉट्सॲप पिंक ही लिंक क्लिक केली की युजर्सचा फोन हॅक होतो. सध्या सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे युजर्सनी अशा मेसेज पासून अत्यंत सावध राहण गरजेचं आहे. संपूर्ण फोन हॅक होतो. तुमचे काँटॅक्ट नंबर्स, फोटो, मेसेजेस, बँक डिटेल्स हे सगळे हॅकर्सला मिळेल. युजर्सची वैयक्तिक माहिती ही हॅकर्सला मिळते आणि ते त्याच्या जाळ्यात अडकतात.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....
भारीच! जाणून घ्या, जबरदस्त फीचर्सhttps://t.co/6vGEYlU10V#Google#GoogleChrome#technology
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021