ग्रुप न बनवता एकाचवेळी अनेकांना WhatsApp मेसेज कसे पाठवायचे? जाणून घ्या
By सिद्धेश जाधव | Published: September 7, 2021 07:21 PM2021-09-07T19:21:26+5:302021-09-07T19:21:43+5:30
Whatsapp Tips And Tricks: अनेकांना एकसाथ मेसेज पाठवण्याचा ग्रुप हा एकमेव मार्ग व्हॉट्सअॅपवर उपलब्ध नाही. त्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरचा वापर करू शकता.
WhatsApp देशातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. परंतु या अॅपवरील ग्रुप्स मात्र त्रासदायक ठरू शकतात. एकाच वेळी अनेकांना मेसेज पाठवण्यासाठी ग्रुप्स उपयोगी पडतात. परंतु एकाच ग्रुपमध्ये सर्व असतीलच किंवा जे आहेत त्या सर्वांना तुम्हाला मेसेज पाठवायचाच असेल असे नाही. जे लोक व्हॉट्सअॅप एक्सपर्ट आहेत त्यांना माहित असेल कि अनेकांना एकसाथ मेसेज पाठवण्याचा ग्रुप हा एकमेव मार्ग व्हॉट्सअॅपवर उपलब्ध नाही. त्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरचा वापर करू शकता.
Broadcast List म्हणजे काय?
ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी तुमच्या कॉन्टॅक्टसमधील अनेकांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू शकता. एकदा बनवलेली ब्रॉडकास्ट लिस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. या फिचरमुळे प्रत्येक प्रसंगासाठी नवीन ग्रुप बनवावा लागत नाही. तसेच तुम्ही या लिस्टला तुमच्या सोयीनुसार नाव देऊ शकता.
व्हॉट्सअॅपवर ब्रॉडकास्ट लिस्ट फीचरचा वापर कसा करायचा
एका ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 256 कॉन्टॅक्टस अॅड करू शकता. या यादीत ज्यांचा समावेश करायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे.
Broadcast List बनवण्यासाठी
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅपमध्ये वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लीक करा आणि ‘New broadcast’ वर क्लीक करा.
- आता तुम्हाला जे लोक या यादीत हवे आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शोधा आणि ते सिलेक्ट करा
- कॉन्टॅक्टस सिलेक्ट करून झाल्यावर तळाला उजव्या कोपऱ्यात असलेल्या चेकमार्क वर क्लीक करा. तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार आहे.
ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरचा एक दोष म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमचा नंबर सेव असला पाहिजे. तरच तुमचा मेसेज त्या व्यक्तीला पोहोचेल.
तुम्ही या ब्रॉडकास्ट लिस्टमधून कॉन्टॅक्टस काढू आणि जोडू देखील शकता. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो करून ब्रॉडकास्ट लिस्ट एडिट करावी लागेल:
- सर्वप्रथम लिस्ट एडिट करायची आहे ती ओपन करा
- त्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक करा आणि ‘Broadcast list info’ निवडा
- इथे तुम्ही या यादीचे नाव बदलू शकता, ‘Add recipients’ वर क्लिक करून नवीन कॉन्टॅक्टस अॅड करू शकता.
- ब्रॉडकास्ट लिस्टमधून कॉन्टॅक्ट काढून टाकण्यासाठी ‘Edit recipients’ वर क्लीक करून कॉन्टॅक्ट समोरील "x" वर क्लीक करा आणि त्यानंतर चेकमार्कवर क्लीक करा.