Aadhaar Pay: आता Aadhaar Number वरून पाठवता येणार पैसे, जाणून घ्या पद्धत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 07:09 PM2021-11-19T19:09:49+5:302021-11-19T19:10:01+5:30

How To Send Money Using Aadhaar Number: अजूनही अनेकांकडे स्मार्टफोन किंवा UPI Address नाही, त्यामुळे अशा लोकांना Online Payment करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी UIDAI ने BHIM युजर्सना Aadhaar Number चा वापर करून पैसे पाठवण्याची सुविधा दिली आहे.

How to send money using aadhaar number in bhim  | Aadhaar Pay: आता Aadhaar Number वरून पाठवता येणार पैसे, जाणून घ्या पद्धत 

Aadhaar Pay: आता Aadhaar Number वरून पाठवता येणार पैसे, जाणून घ्या पद्धत 

Next

Aadhaar Pay: BHIM चा वापर करणारे युजर्स आधार कार्ड नंबरचा वापर करून त्या लोकांना पैसे पाठवू शकतात ज्यांच्याकडे फोन किंवा युपीआय अ‍ॅड्रेस नाही, अशी माहिती UIDAI ने दिली आहे. यामुळे डिजिटल व्यवहार करणे अजून सोयीस्कर होईल. कारण अजूनही अनेक लोक डिजिटल झालेला नाहीत. अजूनही अनेकांकडे स्मार्टफोन किंवा यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) अ‍ॅड्रेस नाहीत, त्यामुळे अशा लोकांना ऑनलाईन पेमेंट करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी युआयडीएआयने भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) युजर्सना फोन किंवा युपीआय अ‍ॅड्रेस नसलेल्या लोकांना आधार नंबरचा वापर करून पैसे पाठवण्याची सुविधा दिली आहे.  

तुम्हाला माहित असेल कि भीम एक युपीआय आधारित पेमेंट इंटरफेस आहे. या सिस्टमवरून पैसे पाठवण्यासाठी मोबाईल नंबर, युपीआय अ‍ॅड्रेस किंवा बँक डिटेल्स आवश्यक असतात. UIDAI नुसार, BHIM मध्ये लाभार्थ्यांच्या आधार नंबरचा वापर अ‍ॅड्रेस म्हणून करता येईल. भीमवरून आधार नंबरचा वापर करून पैसे पाठवण्यासाठी: 

How To Send Money Using Aadhaar Number In BHIM?  

आधार नंबरचा वापर करून पैसे पाठवण्यासाठी भीममध्ये लाभार्थ्यांचा 12 अंकी यूनिक आधार नंबर टाकून व्हेरिफाय करावे लागेल.  

त्यानंतर, सिस्टम आधार लिंकिंग व्हेरिफाय करेल आणि पैसे पाठवण्यासाठी लाभार्थ्यांचा अ‍ॅड्रेस डिस्प्ले करेल, असे युआयडीएआयने सांगितले आहे.  

मिळालेले पैसे कुठे होणार क्रेडिट? 

लाभार्थ्याने डीबीटी/आधार आधारित क्रेडिट मिळवण्यासाठी निवडलेल्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होतील. तसेच आधार पे पीओएसचा वापर करणारे व्यापारी डिजिटल पेमेंटसाठी आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करू शकतील. म्हणजे फक्त आधार नंबर देऊन त्या नंबरशी लिंक असलेल्या खात्यातून व्यापाऱ्यांना पैसे पाठवता येतील, हे ट्रँजॅक्शन व्हेरिफाय करण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर केला जाईल. एका पेक्षा अधिक बँक अकॉउंटचा वापर देखील यासाठी करता येईल.  

Web Title: How to send money using aadhaar number in bhim 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.