व्हॉट्सअॅप ग्रुपवर पर्सनल मॅसेज कसा पाठवायचा? असे जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 05:06 PM2019-01-09T17:06:49+5:302019-01-09T17:08:01+5:30
या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश झाला आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज हजारो मॅसेज येत असतात. तसेच या ग्रुपमध्ये सदस्यही बरेच असतात. यामुळे या ग्रुपवरील एखाद्याला खासगीमध्ये मॅसेज पाठवायचा असल्यास अन् त्याच्या नंबर सेव्ह नसल्यास सेव्ह करण्यापासूनच्या गोष्टी कराव्या लागतात. आता असे काही करावे लागणार नाही. व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरद्वारे तुम्ही थेट त्या व्यक्तीला मॅसेज करू शकणार आहात. चला जाणून घेऊयात.
स्टेप 1 - पहिल्यांदा तुम्हाला ज्याला मॅसेज पाठवायचा असेल त्याने पाठविलेला मॅसेज सिलेक्ट करावा लागेल.
स्टेप 2 - यानंतर उजव्या बाजुला कोपऱ्यात तीन डॉटवर क्लिक करून Reply Privately या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
स्टेप 3 - यानंतर तुम्ही त्या व्यक्तीच्या खासगी चॅटवर रिडायरेक्ट होता. यावर केलेले मॅसेज केवळ त्याच व्यक्तीला जातात.
फायदा काय?
ग्रुपवर सदस्यामध्ये बऱ्याच विषयांवर बोलणे होते. चर्चा होते. यावेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे म्हणणे चुकीचे आहे, किंवा उत्तर दिल्यास काहीवेळा त्याला अपमानजनक वाटू शकते. कारण इतर सदस्यही हे पाहतात. यामुळे हे फिचर चांगले ठरणार आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा चांगले काम केले असेल तर खासगी मॅसेजद्वारे त्याचे अभिनंदनही करता येते.
2019 या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं शक्य होणार आहे. या नव्या अपडेट फीचरमुळे युजर्सला ऑडिओ क्लिप पाठवणे आणखी सोपे होणार आहे.