How to: अशाप्रकारे मिळावा एयरटेलची मोफत कॉलर ट्यून
By सिद्धेश जाधव | Published: July 5, 2021 04:19 PM2021-07-05T16:19:43+5:302021-07-05T16:28:45+5:30
Free Caller tune on Airtel: विंक अॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता.
एकेकाळी कॉलर ट्यून सेवेसाठी टेलिकॉम कंपन्या 30 रुपये प्रति महिना आकारात होते. परंतु आता सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्स आपल्या ग्राहकांना मोफत कॉलर ट्यून देत आहेत. त्यामुळे जर तुम्ही एयरटेलचे ग्राहक असाल तर तुम्ही Airtel च्या Wynk Music अॅपचा वापर करून तुमच्या प्रीपेड आणि पोस्टपेड नंबरसाठी मोफत कॉलर ट्यून सेट करू शकता. विंक अॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता. (How to set caller tune for Airtel using wynk music app)
एयरटेल नंबरवर मोफत हॅलो ट्यून सेट करण्यासाठी पुढील सोप्पी पद्धत वापरा:
- अॅप्पल अॅप स्टोर किंवा गुगल प्ले स्टोरवरून Wynk Music App डाउनलोड करा.
- तुमच्या पोस्टपेड किंवा प्रीपेड एयरटेल नंबरचा वापर करून विंक म्युजिक अॅपवर रजिस्टर करा.
- अॅपच्या होम स्क्रीनवर उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या Airtel Hellotunes च्या आयकॉनवर टॅप करा.
- तुमच्या आवडीचे किंवा तुम्हाला जे गाणं कॉलर ट्यून म्हणून हवं आहे ते शोधा.
- गाणं सापडलं कि त्यावर टॅप करून ‘Activate for free’ ऑप्शनवर टॅप करा.
तुम्ही तुमच्या एयरटेल नंबरवरून 543211 या टोल नंबरवर कॉल करून देखील कॉलर ट्यून सेट करू शकता. तसेच ‘SET space सॉंग कोड’ असा एसएमएस 543211 पाठवून देखील कॉलर ट्यून सेट करता येईल.
कॉलर ट्यून बंद कशी करायची?
तुमच्या एयरटेल नंबर वरची कॉलर ट्यून तुम्ही अगदी सहज बंद करू शकता. त्यासाठी Wynk Music अॅपवरील डावीकडील मेनूमध्ये जात. तिचे Manage Hello Tunes ऑप्शन निवडून थ्री डॉट मेनू सिलेक्ट करा. त्यानंतर Stop Hello Tune ची निवड करा.