How to Share Google One Storage: कमी किंमतीत जास्त स्टोरेज मिळवा; अशाप्रकारे गुगल वन स्टोरेज शेयर करा 

By सिद्धेश जाधव | Published: July 6, 2021 07:28 PM2021-07-06T19:28:36+5:302021-07-06T19:28:55+5:30

Shareing Google One Storage: Google One ही गुगलची सशुल्क स्टोरेज सुविधा आहे, ही सेवा मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेयर करता येते.  

how to share google one storage with family | How to Share Google One Storage: कमी किंमतीत जास्त स्टोरेज मिळवा; अशाप्रकारे गुगल वन स्टोरेज शेयर करा 

How to Share Google One Storage: कमी किंमतीत जास्त स्टोरेज मिळवा; अशाप्रकारे गुगल वन स्टोरेज शेयर करा 

googlenewsNext

गुगलने आपली मोफत फोटोज स्टोरेज सेवा गेल्या महिन्यात बंद केली होती. त्यामुळे अनेकांना पर्यायी सेवा शोधाव्या लागल्या. ज्या लोकांना आता मोफत मिळणारी 15GB स्टोरेज पुरत नाही त्यांना गुगलने Google One चा पर्याय दिला आहे. गुगल वन ही गुगलची सशुल्क सेवा आहे. इथे तुम्हाला ड्राइव्ह, जीमेल आणि फोटोजसाठी वाढीव स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज वाढवता येते तसेच आपल्या ओळखीच्या लोकांसोबत शेयर करता येते.  

Google One चे प्लॅन्स  

Google One च्या 130 रुपये प्रति महिना प्लॅनमध्ये 100GB स्टोरेज मिळते. तर 210 प्रति महिना शुल्क देऊन 200GB स्टोरेज मिळते. त्यामुळे तुम्ही 200GB असलेला प्लॅन शेयर केल्यास तुम्हाला अर्ध्या खर्चात 100GB स्टोरेज मिळू शकते. ही स्टोरेज शेयर करण्यासाठी:   

How to Share Google One Storage 

  • सर्वप्रथम www.one.google.com ओपन करा. या होम पेजवर डावीकडे असलेल्या ऑप्शन्स मधून Setting वर क्लिक करा.  
  • त्यानंतर Manage Family Settings मध्ये जा आणि Manage वर क्लिक करा. 
  • त्यानंतर Get Started वर क्लिक करा आणि त्यानंतर Create Family Group वर क्लिक करा. 
  • ज्या लोकांसोबत स्टोरेज शेयर करायची आहे त्यांचे ईमेल आयडी टाका. त्यानंतर Send वर क्लिक करा. 
  • आता Family Group मधील लोक तुमची स्टोरेज वापरू शकतील. 

Web Title: how to share google one storage with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.