Whatsapp मुळे फोन मेमरी Full झालीय? मग 'या' ट्रिक्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 01:42 PM2019-08-06T13:42:34+5:302019-08-06T13:48:28+5:30

Whatsapp Tricks: व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता येतात.

how to stop whatsapp from auto downloading media files directly to the phones gallery | Whatsapp मुळे फोन मेमरी Full झालीय? मग 'या' ट्रिक्स करतील मदत

Whatsapp मुळे फोन मेमरी Full झालीय? मग 'या' ट्रिक्स करतील मदत

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो.व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे फोटो आणि व्हिडीओ हे फोनमधील गॅलरीमध्ये सेव्ह होतात. मीडिया फाईल्स व्हॉट्सअ‍ॅप बाय डिफॉल्ट डाऊनलोड करतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता येतात. फोटो, व्हिडीओ, ऑडीओ शेअर करता येतात. मात्र यामुळे अनेकदा फोनची मेमरी ही Full होते. व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे फोटो आणि व्हिडीओ हे फोनमधील गॅलरीमध्ये सेव्ह होतात. त्यामुळेच मेमरी कमी होते. 

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या मीडिया फाईल्स व्हॉट्सअ‍ॅप बाय डिफॉल्ट डाऊनलोड करतं. स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र अनेकदा इंटरनल स्टोरेज फुल झाल्यास स्मार्टफोन स्लो होतो. तसेच फोन सतत हँग होण्यास सुरुवात होते. स्मार्टफोनमधील स्टोरेज कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

अ‍ॅन्ड्रॉईड

- व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. 

- सेटिंगमध्ये जाऊन चॅटवर क्लिक करा. त्यामध्ये Media Visibility वर जाऊन टॉगल ऑफ करा. 

काही सिलेक्टीव्ह चॅटसाठी अशाप्रकारे सेटिंग्स करता येतात. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा. 

- चॅट ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. 

- View Contact वर टॅप करा आणि Media visibility वर क्लिक करा. 

- 'Show newly downloaded media from this chat in your phone's gallery?' असं दिसेल. त्यावेळी No सिलेक्ट करा. 

व्हॉट्सअ‍ॅप यानंतर आपोआप फाईल डाऊनलोड करणार नाही. त्यामुळे युजर्स केवळ त्याना हव्या असलेल्या गोष्टीच डाऊनलोड करू शकणार आहेत. 

technology whatsapp latest upcoming features | खूशखबर! WhatsApp वर लवकरच

आयफोन

- व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करून सेटींगमध्ये जा.

- चॅटमध्ये जाऊन Save to camera roll वर जा आणि टॉगल ऑफ करा.  

- फोनमध्ये डाऊनलोड होऊन नये यासाठी प्रिफरेन्स सेट करा. 

- व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये जा.

- त्यामध्ये डेटा आणि स्टोरेज युजेसमध्ये जा. 

- कोणता डेटा डाऊनलोड व्हायला हवा हे युजर्स ठरवू शकतात.

- मोबाईल डेटा, वाय-फाय आणि रोमिंगचा पर्याय मिळेल. 

- मीडिया फाईल्स यानंतर ऑटो डाऊनलोड करता येतील. 

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप'

व्हॉट्सअ‍ॅपवर काही फोटो किंवा व्हिडीओ हे युजर्सना दुसऱ्यांना सेंड करायचे नसतात. तर स्वत: कडेच ठेवायचे असतात. यासाठी एक खास ट्रिक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आपला सीक्रेट ग्रुप तयार करण्यासाठी काही मिनिटांसाठी कोणत्यातरी एका मित्राला आपल्या या नव्या ग्रुममध्ये सामील करावं लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या नावाने एक नवा ग्रुप तयार करा. काही मिनिटांसाठी त्यामध्ये आपल्या एका मित्राला अ‍ॅड करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ग्रुप इंफोमध्ये जा. यासाठी ग्रुपच्या वर देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यावर आपल्या मित्राला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करा. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच राहाल. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवरचा तुमचा सीक्रेट ग्रुप तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही एकटेच असल्याने तुम्हाला हवे असलेले फोटो आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित आहेत. 

WhatsApp Pay CONFIRMED! Platform to be launched in India in soon, says global head | आता Google Pay ला टक्कर देणार WhatsApp Pay; लवकरच भारतात होणार लाँच!

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं. आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा. आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा. चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही. आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अ‍ॅक्सेस करता येतं.

 

Web Title: how to stop whatsapp from auto downloading media files directly to the phones gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.