WhatsApp: डेस्कटॉपवर नेहमी ओपन असतं तुमचं WhatsApp? अशा प्रकारे प्रायवेट चॅट करा ब्लर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 06:02 PM2023-03-31T18:02:39+5:302023-03-31T18:03:43+5:30
How To Blur Whatsapp Messages On Desktop: जेव्हा कधी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेले असता तसेच व्हॉट्सअॅपवरून कुणासोबत बोलत असता तेव्हा अनेकदा कुणीतरी डोकावून पाहत असतो. तसेच तुम्ही जे काही बोलता ते अशी व्यक्ती वाचत असते.
जगभरातील कोट्यवधी लोकांकडून पर्सनल आणि प्रोफेशनल कम्युनिकेशनसाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. ते युझर्ससाठी वन स्टॉप डेस्टिनेशन बनलं आहे. कारण त्यामुळे लोक मेसेजबरोबरच डॉक्युमेंट्स पाठवणे, व्हिडीओ कॉल करणे, यासारखी कामं सहजपणे करू शकतात. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेले असता तसेच व्हॉट्सअॅपवरून कुणासोबत बोलत असता तेव्हा अनेकदा कुणीतरी डोकावून पाहत असतो. तसेच तुम्ही जे काही बोलता ते अशी व्यक्ती वाचत असते.
तुम्हालाही हा त्रास तुमच्या ऑफिसमध्ये होत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहोत. जिचा वापर करून तुम्ही तुमचं व्हॉट्स अॅप ऑफिसमधील लोकांपासून सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ क्रोमवर एक एक्सटेंशन डाऊनलोड करावं लागेल. हे एक्सटेंशन प्रायव्हसी टूलसोबत येतं. WA Web Plus for WhatsApp हे असं एक एस्क्टटेंशन आहे जे तुमचे चॅट कॉन्टॅक्टसह सर्व काही ब्लर करून टाकतं. त्यानंतर तुम्ही कुणासोबत चॅट करत आहात आणि काय बोलत आहात हे कुणालाही कळू शकणार नाही.
असा करा WA Web Plus for WhatsApp एक्सटेंशनचा वापर
- सर्वप्रथम क्रोम वेब स्टोअर उघडा आणि WA Web Plus for WhatsApp सर्च करा
- त्यानंतर Add To Chrome या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर टूलबारवर एक्स्टेंशनसाठी एक नवीन शॉर्टकट दिसेल
- व्हॉट्सअॅट लॉन्च करण्यासाठी या शॉर्टकटवर क्लिक करा
- एक्सटेंशनचा मेनू उघडण्यासाठी पुन्हा शॉर्टकटवर क्लिक करा
- WA Web Plus for WhatsApp युझरना अनेक बाबतीत फायदेशीर ठरतो. त्यामध्ये युझर्स लॉक स्क्रिन पासवर्ड सेट करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवरून उठाल तेव्हा हा पर्याय अधिक उपयुक्त ठरेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप विंडो जरी ओपन झाली तरी पासवर्ड टाकल्याशिवाय त्याचा अॅक्सेस मिळू शकणार नाही.