Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 02:26 PM2024-11-20T14:26:42+5:302024-11-20T14:27:18+5:30

Jio : जिओ युजर्स आपल्या फोनचा रिचार्ज प्लॅन, व्हॅलिडिटी इत्यादी तपासण्यासाठी फोनमध्ये My Jio ॲप इन्स्टॉल करतात.

how to check call history of your mobile number using my jio app check process | Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते

Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते

नवी दिल्ली : जिओ (Jio) युजर्सना, त्यांची एक चूक महागात पडू शकते आणि त्यांची कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतो. अशा परिस्थितीत याचा लाखो युजर्सवर मोठा परिणाम होऊ शकतो. रिलायन्सजिओचे भारतात ४५ कोटींहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. 

जिओ युजर्स आपल्या फोनचा रिचार्ज प्लॅन, व्हॅलिडिटी इत्यादी तपासण्यासाठी फोनमध्ये My Jio ॲप इन्स्टॉल करतात. अशीच एक सुविधा My Jio ॲपमध्ये दिली आहे, जिथे तुमच्या प्रीपेड नंबरवरून केलेल्या सर्व कॉलची हिस्ट्री दिसते. त्यामुळे युजर्सकडून छोटीशी चूक झाली तर ही कॉल हिस्ट्री कोणाच्या तरी हाती लागू शकते.

MyJio ॲपमध्ये तुमच्या नंबरवर ॲक्टिव्ह असलेल्या सर्व सर्व्हिसची डिटेल्स असते. ज्यामुळे एखाद्याला त्याचा ॲक्सेस मिळणे धोकादायक ठरू शकते. MyJio ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी युजर्सचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. यानंतर, नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल, जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला या ॲपमध्ये ॲक्सेस मिळतो. 

जर चुकून एखाद्याने MyJio ॲपवर लॉग इन करण्यासाठी तुमचा जिओ नंबर वापरला आणि चुकून त्याला ओटीपी आला तर तुमचे सर्व गुपित उघड होऊ शकतात. तुम्ही कोणत्या नंबरवर कॉल केला, किती वेळा आणि किती वेळ केला, याची माहिती मिळेल. 

इतकेच नाही तर कोणीतरी तुमच्या नंबरवर सक्रिय इंटरनेट डेटा पॅक आणि इतर सर्व्हिसेसची माहिती देखील मिळवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चुकूनही तुमचा ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. MyJio ॲपमध्ये तुम्ही तुमच्या नंबरवरून कॉल आणि मेसेजची हिस्ट्री देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये MyJio ॲप इंस्टॉल करावे लागेल आणि तुमच्या जिओ नंबरने लॉग इन करावे लागेल.

अशा प्रकारे कॉल हिस्ट्री तपासा...
- पहिल्यांदा फोनमध्ये MyJio ॲप डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा.
- यानंतर, तुमच्या जिओ नंबरने लॉग इन करण्यासाठी नंबर आणि ओटीपी टाका.
- तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करताच तुम्हाला MyJio ॲपचा इंटरफेस दिसेल.
- येथे तुम्हाला तुमचे नाव आणि प्रोफाइल आयकॉन उजव्या वरच्या कोपऱ्यात दिसेल.
- त्यावर टॅप करताच तुम्हाला मोबाईलचा ऑप्शन दिसेल.
- तुम्ही येथे टाइप करताच, स्टेटमेंटवर जा आणि तुमच्या नंबरवरून केलेल्या कॉलची हिस्ट्री तपासा.
- जिओ युजर्स  येथे तीन महिन्यांपर्यंतची कॉल हिस्ट्री तपासू शकतात.

Web Title: how to check call history of your mobile number using my jio app check process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.