अरे व्वा! आता Whatsapp वर मिळणार ट्रेनचं लाइव्ह स्‍टेटस; ऑनलाईन मागवता येणार जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 04:35 PM2022-09-29T16:35:12+5:302022-09-29T16:35:32+5:30

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपवरून तुमच्या प्रवासाची सर्व माहिती मिळवू शकता. तसेच युजर्सना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाहीत.

how to check pnr status live train running status through whatsapp | अरे व्वा! आता Whatsapp वर मिळणार ट्रेनचं लाइव्ह स्‍टेटस; ऑनलाईन मागवता येणार जेवण

अरे व्वा! आता Whatsapp वर मिळणार ट्रेनचं लाइव्ह स्‍टेटस; ऑनलाईन मागवता येणार जेवण

googlenewsNext

Whatsapp युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. प्रवाशांना आता व्हॉट्सअ‍ॅपवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर चेक करता येणार आहे. मुंबईस्थित स्टार्टअप Railofy ने हे नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून तुमच्या प्रवासाची सर्व माहिती मिळवू शकता. तसेच यामुळे आता युजर्सना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर चॅटबॉटच्या मदतीने चालते. चॅटिंगद्वारे नंबर टाईप केल्यानंतरच ट्रेन आणि प्रवासासंबंधीची सर्व माहिती प्रवाशाला उपलब्ध होईल. इतकंच नाही तर IRCTC प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना 139 हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. याच्या मदतीने एक स्टेशन अगोदर येणारे स्टेशन आणि इतर तपशील मिळतील.

असं चेक करा ट्रेनचं लाइव्ह स्टेटस

सर्वप्रथम तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये Railofy चा WhatsApp चॅटबॉट नंबर 91-9881193322 सेव्ह करा.

व्हॉट्सअ‍ॅप एप्लिकेशन अपडेट करा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा.

त्यानंतर तुम्ही फोनमध्ये सेव्ह केलेल्या Railofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडोवर जा.

चॅट बॉक्समध्ये 10 अंकी PNR क्रमांक पाठवा.

Railofy चॅटबॉट तुम्हाला रिअल टाइम अलर्ट आणि ट्रेनचे तपशील पाठवण्यास सुरुवात करेल.

रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाईन मागवता येणार जेवण 

IRCTC रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देखील प्रदान करते. यासाठी प्रवाशांना फोनमध्ये IRCTC अॅप Zoop डाउनलोड करावे लागेल. या अ‍ॅपच्या मदतीने सीटवरच आवडते खाद्यपदार्थ मागवता येतात.

जेवण ऑर्डर करण्याची प्रक्रिया

Zoop चा WhatsApp चॅटबॉट नंबर 91 7042062070 तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.

आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Zoop जूप चॅटबॉट विंडो उघडा.

येथे तुमचा 10 अंकी PNR क्रमांक टाका आणि तुम्हाला जेथून जेवण ऑर्डर करायचे आहे ते येणारे स्टेशन निवडा.

Zoop तुम्हाला चॅटबॉटवर रेस्टॉरंटची यादी दाखवेल. जेवण ऑर्डर करण्यासाठी या रेस्टॉरंटपैकी एक निवडा आणि तुमचे फूड बिल ऑनलाइन भरा.

तुम्ही चॅटबॉटवर तुमची फूड ऑर्डर ट्रॅक करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: how to check pnr status live train running status through whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.