तुमच्या Gmail चा इनबॉक्स फुल्ल होतोय? या ५ प्रकारे करा रिकामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 04:21 PM2023-05-26T16:21:27+5:302023-05-26T16:24:02+5:30

तुम्ही Gmail वापरत असाल तर आज आम्ही तुम्हाला ५ अशा पद्धतींबद्दल सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा Gmail इनबॉक्स रिकामा ठेवू शकता.

how to clean gmail inbox fast quickly check quick steps | तुमच्या Gmail चा इनबॉक्स फुल्ल होतोय? या ५ प्रकारे करा रिकामा

तुमच्या Gmail चा इनबॉक्स फुल्ल होतोय? या ५ प्रकारे करा रिकामा

googlenewsNext

आपण सध्याच्या काळात Gmail सर्वजण वापरतो. पण, जीमेलमध्ये काही दिवसांनी मेमेरी फुल्ल भरते. त्यामुळे मेसेज येण्यास अडचणी येतात. Gmail नेहमी स्पॅम मेल्स, रिमाइंडर मेल्स इत्यादींनी भरलेले असते. आज आम्ही तुम्हाला ५ टिप्स देत आहोत ज्याद्वारे तुम्ही जीमेल क्लीन करू शकता. 

Croma 5 in 1 convertible 1.4 ton 3-star inverter split AC नॅनो शिल्ड कोटिंग आणि फोर-वे ऑटो स्विंगसह!

१. मोठ्या साईजच्या फाइल्स हटवा

तुमच्या इनबॉक्समध्ये मोठी फाइल असल्यास, ती डिलीट करा. पहिल्यांदा आवश्यक फायली नाहीत हे तपासा. ते हटवल्याने तुमच्या इनबॉक्समध्ये बरीच जागा मोकळी होते. यासाठी तुम्हाला सर्च बारमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला एडव्हाईस सर्चवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला डिलीट करायच्या असलेल्या फाईलची साईज किती आहे ती टाकावी लागेल. येथून तुम्ही अटॅचमेंट असलेले मेल निवडू आणि हटवू शकता.

२. टॅबमधील सर्व मेसेज हटवा

Gmail तुमचे ईमेल प्राइमरी, सोशल आणि प्रमोशनल डिव्हाइसमध्ये विभागलेले असते. यामध्ये विविध श्रेणींचे मेल्स आहेत. सोशल आणि प्रमोशनल मेल्सचा बहुतेक उपयोग होत नाही. यात आपण ते सर्व एकाच वेळी हटवू शकता. तुमच्या ईमेल इनबॉक्समध्ये जा. त्यानंतर सोशल टॅबवर जा.

Gmail सर्च बारच्या खाली, या टॅबमधील सर्व ईमेल निवडण्यासाठी एक बॉक्स असेल. यानंतर सर्व मेल्स एकत्र डिलीट करा. एकाच वेळी सर्व मेल हटवण्यासाठी, तुम्हाला प्रमोशन्स/सोशल मधील सर्व मेसेज  निवडा आणि डिलीट वर क्लिक करा.

३. कोणत्याही एका तारखेचे मेल हटवा

तुम्हाला कोणत्याही एका तारखेचे मेल हटवायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. यासाठी तुम्हाला एडव्हाइस सर्च करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तारीख निवडावी लागेल. यानंतर, त्याच तारखेचे सर्व मेल तुमच्या समोर येतील. मग तुम्ही ते सर्व एकाच वेळी हटवू शकता.

४. स्पॅम सेंडर्सना  ब्लॉक करा

काहीवेळा आपल्याला अनवान्टेड सेंडर्सकडून मेल येतात.ते मेसेज सतत येत असतात. या मेलने आपली जागा जास्त जाते. यासाठी तुम्हाला ज्या मेलला ब्लॉक करायचे आहे त्यावर जावे लागेल. नंतर तीन उभ्या रेषा दिल्या जातील, त्यावर क्लिक करा. त्यानंतर Block sender वर क्लिक करा. 

५. टॉपीकद्वारे डिलिट करा

जर तुम्ही एका टॉपीकचे मेल डिलिट करणार असाल तर आपल्या सर्च बारवर जावे लागेल. नंतर यात तुम्हाला टॉपीक भरावा लागेल. यानंतर सर्चवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला मेल दिसतील. यातील तुम्हाला नको असलेले मेल सिलेक्ट करुन डिलिट करु शकता. 

Web Title: how to clean gmail inbox fast quickly check quick steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.