Truecaller वरून पटकन डिलीट करू शकता तुमचा मोबाईल नंबर; जाणून घ्या नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 04:54 PM2022-04-11T16:54:49+5:302022-04-11T16:57:02+5:30
Truecaller : Truecaller अॅप युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. तसेच अनोळखी नंबरवरून आलेल्या युजर्सची देखील माहिती देते.
नवी दिल्ली - Truecaller चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून अनेकांच्या फोनमध्ये ते हमखास पाहायला मिळतं. Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी हे अॅप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. अँड्राईड युजर्स ट्रूकॉलर अॅपला गुगल प्ले स्टोर आणि आयओएस युजर्स अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. कॉल येणाऱ्या नंबरच्या युजर्सची त्वरित माहिती मिळत असल्याने Truecaller अॅप युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. तसेच अनोळखी नंबरवरून आलेल्या युजर्सची देखील माहिती देते. हे आपल्या सर्व युजर्सच्या एड्रेस बुकमधून कॉन्टॅक्ट डिटेल स्टोर करते. मात्र, तुम्ही Truecaller अॅपवरील तुमचा नंबर सहज डिलीट करू शकता.
एखाद्या युजर्सने त्यांच्या फोनमध्ये तुमचा नंबर सेव्ह केलेला असल्यास तुमचा मोबाईल नंबर देखील Truecaller वर उपलब्ध असू शकतो. अॅप सर्व स्कॅम कॉल ट्रॅक करण्याची देखील सुविधा देते. काही लँडलाइनसाठी ट्रूकॉलरमध्ये लँडलाइनच्या एड्रेसचा देखील समावेश आहे. TrueCaller डेटाबेसमध्ये तुमचा मोबाईल नंबर उपलब्ध असल्याने तुम्ही कोणालाही कॉल केल्यास त्वरित त्याची माहिती मिळते. तुम्हाला जर TrueCaller वरील तुमचा मोबाईल नंबर डिलीट करायचा असल्यास सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. TrueCaller अॅपमधील तुमचा फोन नंबर कसा डिलीट करू शकता हे जाणून घेऊया.
असं डिलीट करू शकता Truecaller account
- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Truecaller अॅप ओपन करा व डाव्या बाजूला वरती असलेल्या मेन्यू सिलेक्ट करा.
- मेन्यू सेटिंग्स निवडल्यानंतर पुढील स्टेपवर जा.
- सेटिंग्समध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे पर्याय दिसतील. आता ट्रूकॉलर अकाऊंटला कायमचे डिलीट करण्यासाठी मेन्यूमधील प्रायव्हसी सेंटर हा पर्याय निवडा.
- तुम्हाला ट्रूकॉलर अकाउंट डिलीट करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता Truecaller Search मधून नंबर डिलीट करण्यासाठी Yes पर्यायावर टॅप करा.
- ही स्टेप पूर्ण केल्यानंतर ट्रू कॉलर डेटाबेसमधून तुमचा नंबर डिलीट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.