मस्तच! Google वर 15 मिनिटांपूर्वी काय सर्च केलं? आता कोणालाच कळणार नाही; जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:44 PM2022-03-24T20:44:06+5:302022-03-24T20:45:54+5:30

Google Search History : जर तुम्हाला 15 मिनिटांपूर्वीची तुमची सर्व सर्च हिस्ट्री हटवायची असेल तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तसेच, तुम्ही काय सर्च केलं आहे हे इतर कोणीही पाहू शकणार नाही.

how to delete google search history of last 15 minutes know about new features google tips | मस्तच! Google वर 15 मिनिटांपूर्वी काय सर्च केलं? आता कोणालाच कळणार नाही; जाणून घ्या, कसं?

मस्तच! Google वर 15 मिनिटांपूर्वी काय सर्च केलं? आता कोणालाच कळणार नाही; जाणून घ्या, कसं?

Next

नवी दिल्ली - Google ने मोबाईल अ‍ॅपसाठी नवीन फीचर लाँच करण्यास सुरुवात केली आहे, ज्याची घोषणा कंपनीने 2021 I/O कॉन्फरन्सदरम्यान केली होती. यापैकी एक फीचर Android युजर्सना मोबाईल अ‍ॅपवरून त्यांची शेवटची 15 मिनिटांची Google सर्च हिस्ट्री डिलीट करण्याची परवानगी देतं. हे फीचर फक्त जुलै 2021 मध्ये iOS वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले. मात्र आता ते अँड्रॉईड युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. जर तुम्हाला 15 मिनिटांपूर्वीची तुमची सर्व सर्च हिस्ट्री हटवायची असेल तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तसेच, तुम्ही काय सर्च केलं आहे हे इतर कोणीही पाहू शकणार नाही.

1. सर्वप्रथम तुमच्या Android स्मार्टफोनवर Google अ‍ॅप उघडा. अ‍ॅपच्या वरच्या बाजुला उजवीकडे प्रोफाईल पिक्चर आयकॉनवर क्लिक करा.

2. येथे तुम्हाला 'Delete Last 15 Minutes' चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर, तुमची शेवटची 15 मिनिटांची Google सर्च हिस्ट्री डिलीट केली जाईल. 

3. ज्या युजर्सच्या अँड्रॉईड फोनमध्ये हे फीचर दिसत नाही, त्यांना त्यांचे गुगल अ‍ॅप अपडेट करावे लागेल. जर अपडेट केल्यानंतरही हे फीचर दिसत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला या फीचरची वाट पाहावी लागेल कारण गुगल हळूहळू सर्व युजर्सना हे अपडेट देत आहे.

4. Google ने आपल्या Android युजर्सना याआधीही सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्याय दिला होता. युजर्सना सध्या आजची सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा ऑप्शन मिळत आहे. 

अनेक युजर्सनी गुगलकडे मागणी केली होती की, त्यांना संपूर्ण दिवसाची सर्च हिस्ट्री हटवायची नाही आणि गुगलने त्यांना फक्त शेवटच्या 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्याय द्यावा. अशा परिस्थितीत, ज्या युजर्सना 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री हटवायची आहेत ते हटवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: how to delete google search history of last 15 minutes know about new features google tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल