सावधान! युझर्सचा डेटा धोक्यात, चीनी कंपन्यांकडून होतेय चोरी, असं बदला सेटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 04:14 PM2023-06-19T16:14:26+5:302023-06-19T16:15:40+5:30
तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून चीन कंपन्या तुमचा डेटा चोरी करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चीनी कंपन्या भारतातील युझरांचा डेटा चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. दुसरकीडे निवडक अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये आढळणाऱ्या एका फीचरची बरीच चर्चा होत आहे. काही स्मार्टफोन कंपन्यांच्या फोनमध्ये यूजर्सचा अनुभव जाणून घेण्याच्या नावाखाली यूजरच्या संमतीशिवाय डेटा गोळा केला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Realme, Oppo, OnePlus सारख्या चिनी कंपन्यांकडून 'एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस' फीचरद्वारे यूजर डेटा गोळा करत आहेत.
Youtube' चे वर्चस्व संपवण्यासाठी इलॉन मस्कने आखला मोठा प्लॅन! ट्विटरवर आणणार 'हे' फिचर
Realme, OnePlus आणि Oppo स्मार्टफोन्सवर 'एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिस' फिचर बाय डीफॉल्ट सुरू केले आहे. या फिचरबाबत, कंपन्यांचा दावा आहे की, गोळा केला जाणारा वापरकर्ता डेटा वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी आणि डिव्हाइसला ऑप्टिमाइझ करण्यासाठी वापरला जात आहे. हे तीन फोन ColorOS च्या कस्टमाइज्ड व्हर्जनवर चालतात आणि ते चायनीज टेक कंपनी BBK Electronics च्या मालकीचे आहेत.
ColorOS, RealmeUI आणि OxygenOS वर चालणार्या सर्व नवीन स्मार्टफोन्समध्ये 'एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिस' फिचर डीफॉल्टनुसार चालू असते.
Realme, OnePlus किंवा Oppo स्मार्टफोन देखील असल्यास, तुम्ही एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिस फिचर बंद करू शकता. युझर्स कंपन्यांना लोकेशन, कॅलेंडर, एसएमएस यासह त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करण्यापासून थांबवू शकतात.
नवीन सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या Realme, Oppo आणि OnePlus स्मार्टफोन्सवर वर्धित इंटेलिजेंट सेवा कशी बंद करायची ते जाणून घ्या. हे फिचर बंद केल्याने काही अॅप्स आणि सेवा काम करणे थांबवू शकतात.
अगोदर फोनच्या सेटिंगमध्ये जा.
यानंतर Additional Settings वर जा.
आता सिस्टम सर्व्हिसेस निवडा.
नंतर Enhanced System Services बंद करा
नंतर फोन रीस्टार्ट करा.