ई-श्रम कार्ड डाऊनलोड करण्याचा सोपा मार्ग, कुठेही न जाता घरी बसून होईल काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 03:20 PM2023-03-28T15:20:14+5:302023-03-28T15:20:39+5:30
E Shram Card : ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.
नवी दिल्ली : भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा म्हणजेच ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाते. ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.
या ई-श्रम कार्डमुळे आज देशातील सर्व मजूर एकाच व्यासपीठावर जोडले गेले आहेत. ज्यामुळे आता भविष्यात केंद्र सरकारने कोणतीही योजना आणल्यास नोंदणीकृत कामगार व मजुरांना या पोर्टलच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. दरम्यान, ई-श्रम कार्डसाठी कामगार किंवा मजुरांनी नोंदणी केली तर त्यांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. जाणून घ्या, घरी बसून हे ई-श्रम कार्ड कोणत्या पद्धतीने डाउनलोड करू शकतात.
ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी 'या' गोष्टींची आवश्यकता
- ई-श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कामगार योजनेत नोंदणी करावी लागेल.
- तुमचे वय 18 ते 59 दरम्यान असावे.
- तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ज्यात आधार कार्ड समाविष्ट आहे.
- तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक देखील असावा ज्यावर OTP येईल.
ई-श्रम कार्ड PDF कसे डाउनलोड करावे
- ई-लेबरच्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही https://eshram.gov.in/ या लिंकला भेट देऊनही वेबसाइटला भेट देऊ शकता.
- त्यानंतर उजव्या बाजूला E Shram वर Register चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल.
- येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाकावा लागेल.
- यासोबतच दोन प्रश्न दिले असतील, त्यांची उत्तरेही द्यावी लागतील. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
- तुम्हाला येथे येणारा OTP टाकावा लागेल. त्यानंतर Submit वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला नवीन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
- तुम्ही भरत असलेला आधार कार्ड क्रमांक ई-लेबर कार्डमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी लागेल.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल जो तुम्हाला येथे टाकावा लागेल.
- आता तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील.
- तुम्हाला येथे डाउनलोड UAN कार्ड वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर पीडीएफ तयार होईल आणि लेबर कार्ड दाखवले जाईल.
- त्यानंतर तुम्ही ते कुठूनही प्रिंट करू शकता.