डीएल, आरसी आणि इन्शुरन्स नसल्यास चलन कापले जाणार नाही, सर्व कामे WhatsApp'वर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:25 AM2023-05-22T10:25:37+5:302023-05-22T10:33:03+5:30

तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, कार किंवा बाईकची इन्शुरन्स प्रत घरी विसरला असलात तरी ट्रॅफिक पोलीस आता दंड करणार नाहीत.

how to download pan card driving license rc and insurance copy from whatsapp chatbot through digilocker | डीएल, आरसी आणि इन्शुरन्स नसल्यास चलन कापले जाणार नाही, सर्व कामे WhatsApp'वर होणार

डीएल, आरसी आणि इन्शुरन्स नसल्यास चलन कापले जाणार नाही, सर्व कामे WhatsApp'वर होणार

googlenewsNext

आपल्याकडे आता वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि विम्याची प्रत सोबत नसल्यास चलन कापले जाते. यावेळी वाहतूक पोलीस तुमची कोणतीही बाजू ऐकत नाहीत. दरम्यान, कार आणि दुचाकी चालकाला यात १००० ते ५००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. पण आता तुमच्याकडे DL, RC आणि विम्याची कोणतीही कागदपत्रे नसली तरी वाहतूक पोलीस तुमचे चलन कापू शकणार नाहीत. यासाठी तुमच्या फोनमध्ये फक्त WhatsApp असणे आवश्यक आहे.

आता WhatsApp आणि DigiLocker च्या सेवा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आता कार आणि बाईक चालक WhatsApp वरुन MyGov Helpdesk चॅटबॉटवर डिजिलॉकर सेवेचा लाभ घेऊ शकता. 

HP Smart Tank 580: फोनवरून द्या कमांड, घर किंवा छोट्या व्यवसायासाठी आहे फायदेशीर डील

मात्र, डिजीलॉकर अॅपवर सर्व कागदपत्रे अपलोड केली असतील तरच डिजीलॉकर सेवा व्हॉट्सअॅपद्वारे वापरता येईल, अशी अट आहे. तुम्ही तसे केले नसेल तर, आधी तुम्हाला डिजीलॉकर अॅपमध्ये डीएल, आरसी आणि इन्शुरन्स की कॉपी डाउनलोड कराव्या लागतील. हे केल्यानंतर, तुम्ही ही कागदपत्रे वाहतूक पोलिसांना कधीही दाखवू शकता. सर्व DigiLocker कागदपत्रे सर्वत्र वैध आहेत.

WhatsApp' वरून डॉक्युमेंट कसे डाउनलोड करायचे?

यासाठी तुम्ही MyGov HelpDesk चा चॅटबॉट क्रमांक 9013151515 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करावा.

त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करून न्यू चॅट पर्यायावर जावं लागेल.

यानंतर वापरकर्त्यांना MyGov हेल्पडेस्क चॅटमध्ये हाय लिहावे लागेल.

त्यानंतर चॅटमध्ये तुम्हाला डिजीलॉकर सेवा निवडावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला डिजिलॉकर खात्याची माहिती द्यावी लागेल.

यानंतर, डिजीलॉकर खाते आधारच्या 12 अंकी क्रमांकाशी लिंक करून प्रमाणीकरण करावे लागेल.

यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ओटीपीची पडताळणी करावी लागेल.

यानंतर, चॅटबॉट सूचीमध्ये कागदपत्रे डिजिलॉकर खात्याशी जोडली जातील.

त्यानंतर डाऊनलोड करा, टाइप करा, पाठवा पर्याय दिसेल, जिथून डॉक्युमेंट डाउनलोड करता येईल.

Web Title: how to download pan card driving license rc and insurance copy from whatsapp chatbot through digilocker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.