‘हे’ वाचल्यावर ‘Whatsapp स्टेटस’ ठेवण्याआधी दहा वेळा विचार कराल; खाजगी फोटोज अपलोड करण्यापूर्वी...
By सिद्धेश जाधव | Published: March 21, 2022 01:26 PM2022-03-21T13:26:08+5:302022-03-21T13:26:53+5:30
आपल्या आयुष्यातील घडामोडी Whatsapp स्टेट्सला ठेवणं अनेकांना आवडतं. आणि हे स्टेटस फक्त 24 तास ऑनलाईन असतं म्हणून आपण निवांत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का तुमचं व्हॉट्सअॅप स्टेटस कायमस्वरूपी ऑनलाईन राहू शकतं.
आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे व्हॉट्सअॅप स्टोरीज स्टेट्स ठेवता ते फक्त 24 तास ऑनलाईन उपलब्ध असतात. परंतु तसं नाहीय तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोक ते स्टेटस डाउनलोड करू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे ते कायमचं साठवून ठेवू शकतात. तुमच्या भावना, खाजगी फोटोज आणि व्हिडीओजचा अॅक्सेस ते सहज आणि कधीही मिळवू शकतात.
अशा सेव्ह होतात फोनमध्ये व्हॉट्सअॅप स्टोरीज
तुम्ही जेव्हा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांचे व्हॉट्सअॅप स्टोरी स्टेटस ओपन करता तेव्हा ते तुमच्या फोनमध्ये साठवले जातात. ते तुमच्या गॅलरीमध्ये सहज दिसत नाहीत परंतु पुढील स्टेप्स फॉलो करून ते तुम्ही अॅक्सेस करू शकता.
इथे बघा डाउनलोड झालेले व्हॉट्सअॅप स्टोरी स्टेट्स
- व्हॉट्सअॅप स्टोरी स्टेस्टमध्ये जाऊन सर्वप्रथम एखाद्या कॉन्टॅक्टचा फोटो किंवा व्हिडीओ बघा.
- त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जा आणि सेटिंग्सवर क्लिक करा.
- इथे ‘Show Hidden’ फाईल्स ऑप्शन शोध आणि इनेबल करा.
- त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये व्हॉट्सअॅप फोल्डर ओपन करा.
- पुढे मीडिया फोल्डरमध्ये .Statuses नावाचं फोल्डर उघडा. इथे तुम्हाला गेल्या चोवीस तासांत तुम्ही बघितलेले व्हॉट्सअॅप स्टोरीजमधील फोटो किंवा व्हिडीओ बघू शकता.
- हे स्टेस्टस तुम्ही कोणालाही पाठवू शकता किंवा स्वतः वापरू शकता. परंतु लक्षात असू द्या कि असं तुमच्या फोटोज आणि व्हिडीओज सोबत देखील होऊ शकतं.