हॅकर्सना दाखवा ठेंगा; असं करा तुमचं WhatsApp दुप्पट सुरक्षित, जाणून घ्या प्रोसेस
By सिद्धेश जाधव | Published: May 16, 2022 03:03 PM2022-05-16T15:03:58+5:302022-05-16T15:04:10+5:30
WhatsApp वर टू स्टेप व्हेरिफिकेशन फीचर इनेबल केल्यामुळे तुम्ही जास्त सुरक्षित राहू शकता.
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp जितकं लोकप्रिय आहे तितकं धोकादायक आहे. जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त अॅक्टिव्ह युजर्स असलेल्या प्लॅटफॉर्मवर सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे या अॅपची सुरक्षा देखील महत्वाची ठरते. सायबर एक्सपर्टनुसार, अन्य मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स, ई-मेल, बँकिंग अॅप्स प्रमाणेच इथे देखील टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) म्हणजे टू स्टेप व्हेरिफिकेशन (2SA) इनेबल करणं आवश्यक आहे.
टू स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल केल्यानंतर युजर एक PIN (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) सेट करावा लागेल, जो अॅपला सुरक्षेची अजून लेयर देतो. इनेबल केल्यानंतर हॅकर्स या इन्स्टंट मेसेजिंग अॅपला लक्ष्य करू शकणार नाहीत. पुढे आम्ही WhatsApp वर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं इनेबल किंवा डिसेबल करायचं याची माहिती दिली आहे.
असं करा 2FA इनेबल/डिसेबल
- सर्वप्रथम फोनमधील WhatsApp अॅप ओपन करा.
- त्यानंतर सेटिंग्समध्ये जा आणि तिथे दिलेल्या पर्यायांपैकी Account ची निवड करा.
- अकाऊंटमध्ये Two-step verification ऑप्शन इनेबल करा.
- हे फीचर इनेबल करण्यासाठी तुम्हाला 6 अंकी PIN कोड बनवावा लागेल.
- PIN क्रिएट केल्यानंतर कंफर्म करा.
- त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी नोंदवल्यास तुम्ही तुमचं WhatsApp वरून देखील रिकव्हर करू शकता. ही स्टेप तुम्ही सोडू देखील शकता.
- त्यानंतर Save आणि Done वर टॅप करून प्रक्रिया पूर्ण करा.
- आता तुमच्या WhatsApp वर Two Step Verification इनेबल होईल आणि अॅपला सुरक्षेपाची अजून एक लेयर मिळेल. ही डिसेबल करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन two-step-verification डिसेबल करा.