अलर्ट! फोनवर अशी ग्रीन लाईट दिसत असेल तर समजा तुमचा मोबाईल झालाय हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 05:18 PM2024-08-11T17:18:29+5:302024-08-11T17:22:02+5:30

जर फोन हॅक झाला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज अशीच एक खास माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने युजर्स आपला मोबाईल कोण वापरत आहे हे सहज तपासू शकता.

how to find if someone hacked my phone green dot on display | अलर्ट! फोनवर अशी ग्रीन लाईट दिसत असेल तर समजा तुमचा मोबाईल झालाय हॅक

अलर्ट! फोनवर अशी ग्रीन लाईट दिसत असेल तर समजा तुमचा मोबाईल झालाय हॅक

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्यात पर्सनल डेटापासून ते बँक लॉगिनच्या डिटेल्सपर्यंत सर्व गोष्टी असतात. जर फोन हॅक झाला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज अशीच एक खास माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने युजर्स आपला मोबाईल कोण वापरत आहे हे सहज तपासू शकता.

अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये एक खास फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही हॅकर्स किंवा इतर कोणी गुपचूप तुमचं संभाषण ऐकत आहे की नाही हे ओळखू शकता. जेव्हा तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये कॅमेरा किंवा माइक एक्टिव्ह करता तेव्हा वर उजवीकडे एक मिनी आयकॉन दिसेल. तो ग्रीन लाईटच्या, डॉटच्या स्वरूपात देखील येते.

अशा परिस्थितीत जर तुम्ही कॅमेरा किंवा माइकचा वापर केला नाही, त्यानंतरही कॅमेरा आणि माइकचा ग्रीन डॉट किंवा मिनी आयकॉन मोबाईल स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्हाला धोका आहे. अशा स्थितीत माइक आणि कॅमेरा वापरणारे एप्स तुम्ही ताबडतोब शोधावे. 

तुम्हाला एखादा संशयास्पद एप दिसल्यास, तुम्ही ते त्वरित अनइंस्टॉल करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा फॅक्टरी डेटा रिसेटही करू शकता. अशा स्थितीत अनेक अनावश्यक एप्स मोबाईलमधून अनइन्स्टॉल होतील. तुमचा मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमच्या मोबाइल ॲपच्या परमिशन नियमितपणे तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 

तुम्हाला कोणतेही संशयास्पद ॲप दिसल्यास ते ब्लॉक करा. अशाच तंत्रांचा वापर करून हॅकर्स तुमचे बँक तपशील चोरू शकतात. यानंतर ते तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये लुटू शकतात. त्यामुळे नेहमीच अलर्ट राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. 
 

Web Title: how to find if someone hacked my phone green dot on display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.