सेलेब्रेटींप्रमाणे Instagram वर मिळवा ब्लु टिक, व्हेरिफाइड होण्यासाठी फॉलो करा सोप्प्या स्टेप्स 

By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 01:26 PM2022-05-13T13:26:40+5:302022-05-13T13:26:47+5:30

How to Get blue Tick on Instagram: Instagram वर व्हेरीफाईड अकाऊंट मिळवण्यासाठी कोणीही सहज विनंती करू शकतं. याची पद्धत देखील सोपी आहे.  

How To Get Blue Tick On Instagram Know Simple Process Of Getting Verified Badge For Insta  | सेलेब्रेटींप्रमाणे Instagram वर मिळवा ब्लु टिक, व्हेरिफाइड होण्यासाठी फॉलो करा सोप्प्या स्टेप्स 

सेलेब्रेटींप्रमाणे Instagram वर मिळवा ब्लु टिक, व्हेरिफाइड होण्यासाठी फॉलो करा सोप्प्या स्टेप्स 

googlenewsNext

टिकटॉकच्या आगमनामुळे इंस्टाग्रामची भारतातील लोकप्रियता कमी झाली होती. परंतु टिकटॉक भारतात बॅन केल्यानंतर इंस्टानं रील्सचं फिचर सादर करून पुन्हा एकदा आपली लोकप्रियता मिळवली आहे. या फोटो शेयरिंगचं प्लॅटफॉर्मचं रूपांतर व्हिडीओ शेयरिंग अ‍ॅपमध्ये होत आहे. इथे अनेक क्रियेटर्स आपलं कौशल्य दाखवत आहेत. असा क्रियेटर्सना आपल्या युजरनेम समोर ब्लू टिक हवी आहे.  

ब्लु टिक म्हणजे व्हेरीफाईड अकाऊंट. इंस्टाग्रामवर व्हेरीफाईड होण्याची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स लागतात. तसेच काही खाजगी माहिती द्यावी लागते. मग इंस्टाग्राम या माहितीच्या आधारावर तुमचं अकाऊंट Verification Badge साठी पात्र आहे की नाही ते ठरवतं. पुढे आम्ही इंस्टाग्रामवर अकाऊंट व्हेरिफाय करण्याची अर्थात ब्लू टिक मिळवण्याची पद्धत सांगितली आहे.  

How to Get blue Tick on Instagram 

  • सर्वप्रथम Instagram अ‍ॅप ओपन करा आणि ज्या अकाऊंटवर ब्लु टिक हवी आहे त्यात लॉग-इन करा.  
  • त्यानंतर खालच्या बाजूला डावीकडे असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. 
  • प्रोफाईल पेजवर वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करा.  
  • इथे सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा. 
  • त्यानंतर अकाऊंटवर क्लिक करा आणि मग Request Verification वर क्लिक करा. 
  • इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि फोटो आयडी इत्यादी माहिती द्यावी लागेल.  
  • स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा आणि अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेस्ट पाठवा.  

अकाऊंट व्हेरिफिकेशनचे काही नियम 

जाती तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी पात्र असलात तरी रिक्वेस्ट सबमिट केल्यावर ब्लू टिक मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. तुमची विनंती रद्द करण्याची अनेक कारणं असू शकतात. व्हेरीफाईड अकाऊंट युजरनेम बदलू शकत नाहीत. तसेच व्हेरिफिकेशन बॅज इतर कोणत्याही अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करता येत नाही. तसेच खोटी माहिती देऊन व्हेरिफिकेशन मिळवल्यास तो Instagram व्हेरीफाईड बॅज काढून टाकण्यात येईल आणि अकाऊंट बंद देखील केलं जाईल.  

Web Title: How To Get Blue Tick On Instagram Know Simple Process Of Getting Verified Badge For Insta 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.