Free Internet मिळवण्याची ‘या’ सोप्प्या पद्धती माहित आहेत का? डेटा संपल्यावर येतील कामी 

By सिद्धेश जाधव | Published: February 23, 2022 06:38 PM2022-02-23T18:38:47+5:302022-02-23T18:40:54+5:30

How To Get Free Internet: Free Internet मिळवण्याच्या दोन पद्धती तुम्हाला अडचणीच्या वेळी मोफत इंटरनेट मिळवून देण्यास मदत करतील.  

How to get free internet know easy tricks | Free Internet मिळवण्याची ‘या’ सोप्प्या पद्धती माहित आहेत का? डेटा संपल्यावर येतील कामी 

Free Internet मिळवण्याची ‘या’ सोप्प्या पद्धती माहित आहेत का? डेटा संपल्यावर येतील कामी 

googlenewsNext

How To Get Free Internet: घरातून बाहेर पडल्यावर Free Internet ची गरज जास्त असते. बऱ्याचदा दिवस पूर्ण होण्याआधी मोबाईल डेटा प्राण सोडतो आणि त्यानंतर मिळणारा स्पीड जीवघेणा असतो. परंतु अनेक ठिकाणी मोफत Wi-Fi उपलब्ध असतात हे तुम्हाला माहित आहे का? विशेष म्हणजे Facebook च्या मदतीनं युजर्स फ्री Wi-Fi सर्विस वापरू शकतात. त्यामुळे वेगळ्या हॉटस्पॉट शोधणाऱ्या अ‍ॅपची गरज नाही.  

फेसबुक स्थानिक बिजनेसेसच्या पब्लिक Wi-Fi हॉटस्पॉटची माहिती देतो. हे हॉटस्पॉट कंपनीनं व्हेरिफाय केलेले असतात. यातील अनेक Wi-Fi मोफत आणि विश्वासू असतात. यासाठी तुम्हाला Facebook मधील Wi-Fi फायन्डर फिचरची मदत घ्यावी लागेल.  

  • सर्वप्रथम Facebook अ‍ॅप ओपन करा. 
  • वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या मेन्यू बटनवर क्लीक करा.  
  • त्यानंतर Settings And Privacy ऑप्शनवर जा.  
  • इथे Find Wi-Fi ऑप्शनची निवड करा.  
  • त्यांनतर तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील Wi-Fi हॉटस्पॉटची माहिती आणि मॅप दिसेल.  

दुसरी पद्धत तुम्हाला रिचार्ज करते वेळी अतिरिक्त डेटा मिळवून देईल. Airtel, आणि Vi की या प्रमुख टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या वेळीच अतिरिक्त डेटा देतात. परंतु अनेकांना याची माहिती नसते. हा डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त या कंपन्यांचे अ‍ॅप इन्स्टॉल करून त्यातून रिचार्ज करावा लागेल.  

हे देखील वाचा:

Web Title: How to get free internet know easy tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.