फोन चार्जिंगला लावताना तुम्हीही 'ही' छोटीशी चूक करता का?; चार्जर 100 टक्के होईल खराब अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:38 PM2022-04-25T16:38:44+5:302022-04-25T16:41:30+5:30

स्मार्टफोनचा वापर करताना अनेकांचे चार्जर हे लवकर खराब होते. हे सर्व टाळायचं असेल तर एक सोपी पद्धत आहे.

how to keep your smartphone charger fit | फोन चार्जिंगला लावताना तुम्हीही 'ही' छोटीशी चूक करता का?; चार्जर 100 टक्के होईल खराब अन्....

फोटो - गुगल

googlenewsNext

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून तो जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्यासोबत चार्जर मिळतो पण अनेकदा तो लवकर खराब झाल्याचा अनुभव काही लोकांना येतो. त्यामुळे पुन्हा नवीन घ्यावा लागतो. स्मार्टफोनचा वापर करताना अनेकांचे चार्जर हे लवकर खराब होते. हे सर्व टाळायचं असेल तर एक सोपी पद्धत आहे. तुम्ही जर या समस्येने त्रस्त असाल तर त्यासाठी एकच काम करा. ज्यामुळे तुमचा चार्जर लवकर खराब होणार नाही आणि नवीनही विकत घ्यावा लागणार नाही.

जर तुम्ही स्मार्टफोनचे ओरिजल चार्जर वारंवार दुसरं कोणाला तरी चार्जिंगसाठी देत असाल तर समोरचा व्यक्ती तुम्ही दिलेले चार्जर कशा पद्धतीने वापरतो हे तुम्हाला माहिती नाही. यामुळे तुमचे चार्जर खऱाब होऊ शकते. कारण, प्रत्येकाचा स्मार्टफोन थोडा वेगळा असतो. स्मार्टफोन वेगळ्या कंपनीचा आणि वेगळ्या इंचाचा असतो. त्यामुळे स्मार्टफोनच्या चार्जरला नुकसान होऊ शकते. जर या दोन गोष्टी तुम्ही टाळल्या तर तुमचे चार्जर खराब होणार नाही. आपल्या स्मार्टफोनचे चार्जर स्वतः वापरा.

जर तुम्ही स्मार्टफोनचे चार्जर खूपच वेगाने फोनला लावत असेल तर असे करणे सुद्धा लगेचच बंद करा. कारण असे करणे पिनला नुकसान करू शकते. हे काम करणे बंद केल्यास तुमचे चार्जर बरेच महिने व्यवस्थित चालू शकते. तुम्हाला नवीन चार्जर खरेदी करण्याची गरज पडणार नाही. कामाच्या निमित्ताने फोनचा वापर हा हल्ली मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे बॅटरी देखील लवकर लो होते आणि चार्जिंगची गरज भासते. पण फोन चार्जिंगला लावताना काही साध्या चुका टाळल्या तर चार्जर खूप दिवस आपलं काम उत्तम करू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: how to keep your smartphone charger fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.