मस्तच! आता WhatsApp अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्रामशी करू शकता लिंक; कसं ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:37 IST2025-01-22T11:36:49+5:302025-01-22T11:37:21+5:30
WhatsApp : तुमचं WhatsApp अकाऊंट मेटाच्या अकाउंट्स सेंटरशी कनेक्ट करू शकता. याच्या मदतीने तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर थेट WhatsApp स्टेटस शेअर करू शकता.

मस्तच! आता WhatsApp अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्रामशी करू शकता लिंक; कसं ते जाणून घ्या
तुम्ही आता तुमचं WhatsApp अकाऊंट मेटाच्या अकाउंट्स सेंटरशी कनेक्ट करू शकता. याच्या मदतीने तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर थेट WhatsApp स्टेटस शेअर करू शकता. तुम्ही एकाच अकाऊंटने इन्स्टाग्राम किंवा फेसबुक सारख्या अनेक मेटा एप्समध्ये लॉग इन करू शकता. हे फीचर तुम्ही तुमच्या मर्जीने वापरू शकता आणि सुरुवातीला ते बंद असतं.
या फीचरचा मुख्य उद्देश तुम्हाला मेटाचे वेगवेगळे एप्स सहजपणे वापरण्यास सक्षम करणं आहे. जर तुम्ही अनेकदा WhatsApp वर तुमचे स्टेटस अपडेट करत असाल आणि इन्स्टाग्राम किंवा फेसबुक देखील वापरत असाल, तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर तुमचे WhatsApp स्टेटस थेट शेअर करण्यासाठी या फीचरचा वापर करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट करण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत वाचेल. तुम्ही तुमच्या मित्रांशी सहजपणे जोडलेले राहू शकाल.
अकाउंट लॉगिन फीचरसह, तुम्ही WhatsApp किंवा इतर मेटा एप्समध्ये सहजपणे लॉगिन करू शकता, विशेषतः जेव्हा तुम्ही डिव्हाइस बदलता किंवा लॉगआउट करता. जरी हे फीचर पर्यायी असले तरी, मेटा भविष्यात हे फीचर वापरण्याची योजना आखत आहे जेणेकरून तुम्ही तुमचा अवतार मॅनेज करू शकाल आणि एप्सवर एआय स्टिकर्स शेअर करू शकाल.
मेटा म्हणते की, युजर्सची प्रायव्हसी त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. WhatsApp मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे, म्हणजेच तुमचे मेसेजेस आणि कॉल्स सुरक्षित राहतात. कंपनीचं म्हणणं आहे की, अकाऊंट सेंटरशी कनेक्ट केल्याने तुमच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होणार नाही.
WhatsApp ला अकाऊंट्स सेंटरशी जोडण्यासाठी काय करावं?
तुमचे एप अपडेट करा - सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp ची नवीन व्हर्जन असल्याची खात्री करा.
सेटिंग्ज वर जा - WhatsApp ओपन करा आणि सेटिंग्ज वर जा.
ऑप्शन शोधा - अकाउंट्स सेंटरमध्ये तुमचं अकाऊंट जोडण्याचा पर्याय शोधा. जर तुम्हाला हा पर्याय दिसत नसेल, तर कदाचित हे फीचर तुमच्या प्रदेशात अद्याप उपलब्ध नसेल.
तुमचं अकाऊंट लिंक करा - या पर्यायावर टॅप करा आणि सूचनांचं अनुसरण करा. आवश्यक असल्यास, तुमच्या मेटा अकाऊंटने लॉगिन करा.
शेअरिंग सेटिंग्ज एडजस्ट करा - तुम्हाला तुमचे अपडेट्स कसे शेअर करायचे आहेत ते सेट करा, जसं की WhatsApp स्टेटस फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची परवानगी देणं
गरज नसल्यास काढून टाका - जर तुम्हाला हे फीचर आता वापरायचं नसेल, तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट्स सेंटरमधून ते काढून टाकू शकता.
कधी मिळणार हे फीचर?
हे फीचर हळूहळू जगभरात आणलं जाईल, म्हणून युजर्सनी वेळोवेळी त्यांच्या WhatsApp सेटिंग्ज तपासत राहणं गरजेचं आहे.