फक्त SMS पाठवून रोखता येईल Aadhaar चा गैरवापर; UIDAI नं सुरु केली आधार 'लॉक' करण्याची नवीन सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:45 PM2022-02-09T19:45:03+5:302022-02-09T19:45:34+5:30

तुम्ही तुमचा आधार नंबर फक्त एसएमएस पाठवून लॉक आणि अनलॉक करू शकता. यासाठी युआयडीएआयची 'एसएमएस वर आधार सेवा' वापरता येईल.

How To Lock And Unlock Your Aadhaar Using Aadhaar SMS Service   | फक्त SMS पाठवून रोखता येईल Aadhaar चा गैरवापर; UIDAI नं सुरु केली आधार 'लॉक' करण्याची नवीन सेवा

फक्त SMS पाठवून रोखता येईल Aadhaar चा गैरवापर; UIDAI नं सुरु केली आधार 'लॉक' करण्याची नवीन सेवा

Next

आधार कार्ड भारतीयांची ओळख पटवण्यासाठी अनेक ठिकाणी वापरता येतं. सर्वच सरकारी डॉक्युमेंट्स हळूहळू आधारशी लिंक केले जात आहेत, त्यामुळे आधार कार्डचं महत्व देखील वाढलं आहे. असं असताना तुमचं आधार कार्ड चुकीच्या लोकांच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. यावर उपाय म्हणून UIDAI नं आधार लॉक करण्याची सुविधा देखील दिली आहे.  

तुम्ही तुमचा आधार नंबर फक्त एसएमएस पाठवून लॉक आणि अनलॉक करू शकता. यासाठी युआयडीएआयची 'एसएमएस वर आधार सेवा' वापरता येईल. इंटरनेटचा अ‍ॅक्सेस नसलेल्या लोकांना आपल्या आधार लॉक आणि अनलॉक करता यावा म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे.  

सर्वप्रथम व्हर्च्युअल आयडी जनरेट करा 

आधार कार्ड एसएमएसच्या माध्यमातून लॉक अनलॉक करण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्डचा व्हर्च्युअल आयडी बनवावा लागेल. यासाठी देखील तुम्हाला इंटरनेटची गरज नाही. फक्त तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 1947 या नंबरवर GVIDAadhaar-Number-last-4-digits असा एसएमएस पाठवावा लागेल.  

व्हर्च्युअल आयडी रिट्राईव्ह करण्यासाठी त्याच नंबरवर RVIDAadhaar-Number-last-4-digits असा मेसेज पाठवा. त्यानंतर GETOTPAadhaar-NUMBER-last-4-digits असा किंवा व्हर्च्युअल आयडीचा नंबर वापरत असल्यास GETOTPVirtual ID-NUMBER-last-6-digits असा मेसेज 1947 ला पाठवून तुम्ही ओटीपी मिळवू शकता. आधार लॉक अनलॉक करण्यासाठी व्हर्च्युअल आयडी जेनरेट करणं आवश्यक आहे.  

How to Lock/Unlock Aadhaar Number with SMS service? 

1. SMS च्या माध्यमातून आधार कार्ड लॉक करण्यासाठी आधी ओटीपी मागवावा मग LOCKUIDAadhaar NUMBER-last 4-digitsOTP-6-digits असा मेसेज 1947 नंबरवर पाठवावा.  

2. एकापेक्षा जास्त आधार कार्डसाठी एकच रजिस्टर्ड नंबर असल्यास LOCKUIDAadhaar NUMBER-last 8-digitsOTP-6-digits असा मेसेज करून आधार लॉक होईल.  

3. आधार अनलॉक करण्यासाठी UNLOCKUIDVirtual-ID-last-6-digitsOTP-6-digits असा मेसेज करू शकता. एका पेक्षा जास्त आधार कार्ड रजिस्टर्ड असल्यास व्हर्च्युअल आयडीचे शेवटचे 10 अंक टाकावे लागतील.  

हे देखील वाचा:

Web Title: How To Lock And Unlock Your Aadhaar Using Aadhaar SMS Service  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.