Free Fire MAX मध्ये Grandmaster रँकपर्यंत कसं पोहोचायचं? या सोप्प्या टिप्स करा फॉलो
By सिद्धेश जाधव | Published: April 1, 2022 05:16 PM2022-04-01T17:16:49+5:302022-04-01T17:17:10+5:30
Free Fire MAX मध्ये ग्रँडमास्टर रँकपर्यंत पोहोचणं सोपं नाही परंतु या लेखातील टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. यामुळे तुम्ही फक्त ग्रँडमास्टर रँकपर्यंत पोहोचणार नाही तर या गेमचे वर्ल्ड चॅम्पियन देखील बनू शकता.
Free Fire MAX खेळणाऱ्या प्लेयर्ससाठी ग्रँडमास्टर रँक खूप महत्वाची आहे. कारण ही गेममधील टॉप रँक आहे. त्यामुळे सर्वच गेमर्स कधी ना कधी या रँक पर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगून असतात. परंतु ही रँक मिळवणं इतकं सोपं नाही. परंतु तुम्ही काही टिप्स फॉलो करून नक्कीच Grandmaster tier म्हणजे टॉप रँकपर्यंत पोहोचू शकता.
स्क्वॉड देखील तगडा असावा
टॉप रँक मिळवण्यासाठी Free Fire Max मध्ये चांगल्या स्क्वॉड अर्थात संघाची गरज असते. प्रत्येकाला आपली कामगिरी माहिती असेल, असा संघ तयार करावा. तसेच संघातील प्लेयर्सशी सतत बोलणं चालू असावं. जेव्हा संघाची कामगिरी चांगली होईल तेव्हा तुमचे पॉईंट्स देखील वर जातील.
कॅरेक्टर्स आणि कॅरेक्टर्स कॉम्बिनेशन
या गेममध्ये चांगले कॅरेक्टर्स तुम्हाला कठीण काळात देखील गेम जिंकून देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या गेमला साजेसं कॅरेक्टर निवडा. तसेच तुमच्याकडे गेम मध्ये मल्टीपल स्किल्स असतील तर भारीच. जर तुम्ही तुमच्या कॅरेक्टरशी मिळतं जुळतं इतर कोणच्या कॅरेक्टरचा कॉम्बो बनवला तरी देखील जिंकण्याच्या शक्यता वाढतात.
कॅरेक्टर पेट कॉम्बिनेशन
फ्री फायर मॅक्समध्ये पेट्स खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे गेममध्ये त्या पेट्सची निवड करावी जे तुमच्या कॅरेक्टर सोबत योग्य कामगिरी करू शकतात.
सुरक्षित राहणं महत्वाचं
Battle Royale मोडमध्ये अनेक मार्गांचा अवलंब करून रिवॉर्ड्स मिळवता येतात, त्यात शेवटपर्यंत जिवंत राहण्याचा देखील समावेश आहे. जितका जास्त वेळ तुम्ही जिवंत राहू शकता तितके जास्त पॉईंट्स मिळतात. त्यामुळे शत्रूपासून बचाव करून राहणं केव्हाही चांगलं. यासाठी आजूबाजूला लक्ष ठेवावं आणि जिथे जास्त लोक उतरतात तिथे उतरू नये.
सराव देखील महत्वाचा
जो गेम तुम्ही खेळत आहात त्याची छोट्यातल्या छोट्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी प्लेयर्सना मॅप फिरवणं, घाईत लपणं, अचूक नेम धरणं या गोष्टी जमल्या पाहिजेत. यासाठी जास्त सराव आवश्यक आहे. जर तुम्ही या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला फ्री फायर मॅक्सचं वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.